शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

बोर व्याघ्रात वाघांची संख्या रोडावल्याने ताडोब्यातील ‘टायगर’ करताहेत एन्ट्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. जंगलाची सलगता असे वैशिष्ट्य असलेल्या या वाघांसाठी संरक्षित असलेल्या विस्तीर्ण परिसरात सध्या एकूण सहा प्रौढ वाघ-वाघिणींचे वास्तव्य आहे. यात चार वाघिणींचा तर बीटीआर-८ आणि बीटीआर-१० या दोन वाघांचा समावेश आहे. तर याच व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.

विदर्भ देशाची व्याघ्र राजधानीच-    विदर्भात एकूण पाच व्याघ्र प्रकल्प असून ३०० चौ. कि.मी. चे परिक्षेत्र वाघांच्या वास्तव्यासाठी राखीव आहे. या आरक्षित जंगल परिसरात मोठ्या संख्येने वाघ असल्याने विदर्भ सध्या देशाची व्याघ्र राजधानीच ठरत आहे. विदर्भात ३०० हून अधिक वाघ आहेत.

वनपरिक्षेत्रात सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू-    वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या वनपरिक्षेत्रात मागील सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू झाला. या दोन वाघांपैकी एकाचा नैसर्गिक तर दुसऱ्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. -    २५ ऑगस्ट २०१३ ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील मदना शिवारात वाघाचा तर १४ ऑक्टोबर २०१७ ला कारंजा वनपरिक्षेत्रात शेत सर्व्हे क्रमांक ७६/१ मध्ये वाघिणीचा मृतदेह सापडला होता.

जंगलाची सलगता -    जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.कि.मी. तर नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी. तसेच नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी. आहे. जंगलाची सलगता हे बोरचे वैशिष्ट्य असून वाघांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचेच ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

२०१८ मध्ये वर्ध्यात आला होता ताडोब्यातील वाघ-   चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक अडीच वर्षीय तरुण वाघ नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वरोरा मार्ग वर्धा जिल्ह्यातील देवळीपर्यंत येत तो सुमारे ५०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशातील बैतुलच्या जंगलात गेला. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा वाघ वर्धा जिल्ह्यात आल्यावर त्याने वर्धा जिल्ह्यात मनुष्यावर हल्ला केला नाही. पण अमरावती जिल्ह्यात त्याने मनुष्याला ठार केले होते.

‘पुष्पा’ १९ मार्चपासून वनविभागाला गवसेना

-    नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वर्धा शहराशेजारील पवनार शेत शिवारापर्यंत आलेल्या अडीच ते तीन वर्षे वयोगटातील वाघ आंजी (मोठी) पर्यंत जात पुन्हा पवनार शिवारात परतला. पण हाच वाघ १९ मार्चपासून वनविभागाला गवसलेला नाही. या वाघाच्या मागावर असलेले वन्यजीव प्रेमी त्याला लाडाने ‘पुष्पा’ संबोधित असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

टॅग्स :TigerवाघBor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प