शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:41 IST

स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून वर्धा न.प.ने नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत त्यांना स्वच्छचे महत्त्वही पटवून दिले. त्यावेळी वर्धा न.प.च्या या कार्याची दखल घेवून पालिका प्रशासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे३४ एकर जमिनीवर तयार होतोय खत कारखाना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून वर्धा न.प.ने नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत त्यांना स्वच्छचे महत्त्वही पटवून दिले. त्यावेळी वर्धा न.प.च्या या कार्याची दखल घेवून पालिका प्रशासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मात्र, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या विषय मार्गी लावण्याकडे होत असलेले दुर्लक्ष न.प.च्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारेच ठरत आहे. नजीकच्या इंझापूर येथे सुमारे ३४ एकर जमिनीवर न.प. प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा कारखाना तयार होणार आहे. पण, सध्यास्थितीत तेही काम कासवगतीनेच होत असल्याचे दिसून येते.घराघरातून कचरा गोळा करून तो एकाजागी साठवून त्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी एका खासगी कंपनीला न.प. प्रशासनाने कंत्राट दिला आहे. १ आॅक्टोबर पासून सदर कंत्राटदार आपले काम सुरू करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्यापही दुरूस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ व सुंदर वर्धा शहर या उद्देशाने न.प. प्रशासनाने खरेदी केले विविध साहित्य सध्या न.प.च्या निर्माणाधिन इमारतीच्या आवारात धुळखात आहे. तर शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या ओला व सुका अशा वेगवेळ्या अनेक कचरापेट्या अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामादरम्यान तोडण्यात आले आहे. तर ज्या कचरापेट्या कायम आहेत. त्यात काही सुजान नागरिक घरातील व व्यावसायिक प्रतिष्ठानातील कचरा टाकत असल्याचे दिसून येते. अनेक कचरा पेट्या जलवाहीनीच्या कामादरम्यान तोडण्यात आल्याने न.प.चा त्यावर खर्च झालेला निधी वाया गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यामुळे न.प. प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.ट्रॅक्टर जेसीबी व नवीन ट्रॅक्टर ठरत आहे मदतगारशहरातील विविध भागातील कचºयाचे ढिगारे न.प. प्रशासानाचा स्वच्छता विभाग ट्रॅक्टर जेसीबीच्या सहाय्याने उचलून तो ट्रॅक्टर ट्रॉलीत लादून नियोजित ठिकाणी नेत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय नव्याने खरेदी केलेले ट्रॅक्टर व ट्रॉली कचरा व्यवस्थापनासाठी न.प.ला मदतगार ठरत असल्याचेही सांगण्यात आले.काही ‘नम्मा’ झाले सुरूस्वच्छ वर्धा या उद्देशाने न.प. प्रशासनाने नम्मा टॉयलेटची खरेदी केली. बजाज चौक, वर्धा रेल्वे स्थानक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नम्मा टॉयलेट लावण्यात आले. परंतु, सुरूवातीला काम पूर्ण होऊनही त्याच्या लोकार्पणासाठी मुहूर्त न.प.ला सापडत नव्हता. त्याबाबतचे वृत्त लोकमतने ‘ नम्माच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडे ना’ या मथळ्याखाली २ जुलैला प्रकाशित करताच काही नम्मा टॉयलेटचे लोकार्पण करण्यात आले. एकूण पाच ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे न.प.च्या निश्चित केले आहे हे विशेष.