शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

फाटक्या पादत्राणांना टाचे मारून उसवलेले आयुष्य शिवतो!

By admin | Updated: March 22, 2015 01:52 IST

वयाच्या तिसाव्या वर्षी पतीचे निधन झाले. मुलांचे पालन पोषण करून संसाराचा गाडा रेटला. मुले मोठी झाली त्यांचे लग्न झाले.

प्रफुल्ल लुंगे सेलू वयाच्या तिसाव्या वर्षी पतीचे निधन झाले. मुलांचे पालन पोषण करून संसाराचा गाडा रेटला. मुले मोठी झाली त्यांचे लग्न झाले. आता सर्व सुरळीत होईल असे वाटत असताना अचानक दोन करत्या मुलांना मृत्यूने कवटाळले. पुन्हा त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आली. आपल्या फाटक्या संसाराच्या भरण पोषणाकरिता नागरिकांंच्या फाटक्या चपला शिवून व बूट पॉलीश करून वयाच्या ७० व्या वर्षी लक्ष्मीचा जीवनाशी लढा सुरू आहे. लोकांच्या फाटक्या पादत्राणांना टाचे मारून आपले आयुष्य शिवत असल्याचे लक्ष्मीबाई सहज बालून जातात. येथील मेडिकल चौकात उन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लक्ष्मीबाई रामलाल देवरे यांचे काम सुरूच आहे. लोकांच्या फाटलेल्या पदत्राणाला शिवून व बुटपॉलीश करीत मिळालेल्या तुटपुंज्या कमाईवर फाटक्या संसाराला ढिगळ लावण्याचे काम त्यांच्याकडून अविरत होत आहे. लक्ष्मीबाईचे पती रामलाल यांचे सुमारे ४० वर्षांपूर्वी निधन झाले. तिला रामू, सुरेश व खुशाल अशी तीन मुले होती. त्यांच्या लग्नानंतर तिघाही मुलांना मुलेबाळे झाली. नातू व नाती आजीच्या लाडात वाढत असताना अचानाक मुलगा रामू याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याची पत्नी एक मुलगा व दोन मुली उघड्यावर आल्या. हे दु:ख उराशी असताना दुसरा मुलगा सुरेशचे आकस्मिक निधन झाले. दोन मुलाच्या मृत्यूमुळे लक्ष्मीबाईवर आभाळ कोसळले. दोन्ही मुलांच्या पत्नी व तिच्या मुलाला घेवून लक्ष्मीबाई त्यांच्या कुटुंबाला हातभार लावीत असून नातवाला शिकविण्यासाठी धडपडत आहे.खुशाल नावाचा मुलगा आपल्या परिवारासह दोन मुले व एका मुलीला घेवून तालुक्यातील गायमुख येथे राहतो. मृतक मुलगा सुरेशची पत्नी अरूणा व नातू उदय (११) याच्यासोबत लक्ष्मीबाई कोथीवाडा वसाहतीत राहते. लक्ष्मीबाईला श्रावणबाळ योजनेचे तुटपुंजे मानधन व चपला जोडे शिवण्यातून कधी ५० तर कधी १०० रुपये रोज मिळतो.शहराच्या गजबजलेल्या मेडिकल चौकात ७० वर्षीय वृद्ध ग्राहकांच्या प्रतीक्षेत उन्ह, वारा, पाऊस झेलत आपल्या फाटक्या संसाराला ठिगळ लावण्यासाठी लक्ष्मीबाईला दिवसभर परिश्रम करताना पाहून धडधाकट माणसालाही ती लाजविते. शासनाच्या योजना लक्ष्मीबाईकरिता त्या कुचकामी ठरत आहेत. यामुळे या योजना गरजवंताकरिता वा केवळ नावाच्याच असा प्रश्न समोर येत आहे.