शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

सावंगी (देरडा) परिसरात बिबट्याची धूम

By admin | Updated: March 6, 2016 02:17 IST

तालुक्यातील सावंगी (देरडा), धानोली, साकुर्ली परिसरात बिबट्याने एक महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे.

वन विभागाने लावला पिंजरा : तरीही बिबट मोकाटच; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरणसमुद्रपूर : तालुक्यातील सावंगी (देरडा), धानोली, साकुर्ली परिसरात बिबट्याने एक महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्या त्यांना हुलकावणी देत असल्याचे दिसते. बिबट्याचा सावंगी (देरडा) परिसरामध्ये एक महिन्यापासून खुला वावर होता. गावाच्या बाजुलाच नदी असल्यामुळे त्याचा परिसरामध्ये मुक्तपणे संचार सुरू आहे. सावंगी येथील विनोद डंभारे यांच्या गायीचे वासरू ओढत नेवून फस्त केले. याची तक्रार समुद्रपूर वनविभागाला दिली. ज्या ठिकाणी वासरू मारले होते, तिथे कॅमेराही लावला. सदर बिबट्या त्या ट्रॅपमध्ये कॅमेराबंद झाला. त्यानंतर बिबट्याने मंगेश टेकाम यांची बकरी ठार केली. सरपंच डंभारेसह गावकऱ्यांनी वनविभागाला पिंजऱ्याची मागणी केली तेव्हा वन विभागाने पिंजरा लावला. पिंजऱ्यामध्ये कुत्रा ठेवण्यात आला; मात्र बिबट्या त्या पिंजऱ्याकडे गेलाच नाही. बिबट साकुर्लीकडे आढळल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे वनविभागाने सदर पिंजरा साकुर्लीकडे लावला. तिथेही बिबट आला नाही. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीत असून ते शेतात सायंकाळी ५ वाजताच्या नंतर थांबत नाहीत. रात्रीला शेतात जाणे टाळतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी) बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठारआकोली : परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घालता आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शेतात बांधून असलेले जर्सी गायीचे एक वर्षाचे कालवड त्याने फस्त केले. शिकारीच्या वेळी बिबटासोबत सोबत बछडाही असल्याचे पायाच्या ठस्यावरून दिसत असल्याचे क्षेत्र सहायक राजू तुमडाम यांनी सांगितले.दीपक काकडे यांचे शेत गावानजिक असून शेतात इतर गुरांसमवेत जर्सी गायीची कालवड बांधली होती. काल रात्रीच्या सुमारास या कालवडीवर बिबटाने हल्ला केला. यात कालवड ठार झाली. आज सकाळी काकडे यांचा मुलगा सचिन हा शेतात गेला असता सदर घटना उघडकीस आली. क्षेत्र सहायक राजू तुमडाम, वनरक्षक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोयर यांनी शवविच्छेदन केले. सदर कालवडीची किंमत २५ हजार रुपये होती, असे सांगण्यात आले.(वार्ताहर)