शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

तहसीलदाराच्या आदेशाला एसडीओंचा स्थगनादेश

By admin | Updated: July 26, 2016 01:51 IST

घराच्या बांधकामासाठी रॉयल्टीसह रेती घेतल्यावर त्याची जप्ती दाखवून मनमानी आदेश करणाऱ्या तहसीलदाराच्या कारभारावर रोष होता.

दोन्ही आदेश होणार खारीज : मनमानी कारभाराला चपराकआष्टी (श.) : घराच्या बांधकामासाठी रॉयल्टीसह रेती घेतल्यावर त्याची जप्ती दाखवून मनमानी आदेश करणाऱ्या तहसीलदाराच्या कारभारावर रोष होता. याप्रकरणी उपविभागीय महसूल अधिकारी आर्वी यांनी या आदेशावर स्थगनादेश दिला. तहसीलदाराच्या या कारभारावर ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते.येथील नरेश भार्गव व नवीन आष्टी वसाहतीतील अनिल कोहळे या दोघांनी घराच्या बांधकामासाठी रेतीचे ठेकेदार अनिल मानकर यांच्याकडून रेती विकत घेतली होती. बांधकाम करण्यापूर्वीच तहसीलदार सीमा गजभिये यांनी तलाठी तथा मंडळ अधिकारी यांनी वस्तुस्थिती सांगूनही रेती चोरीचा दंड लावला. भार्गव यांना ४ लाख ८ हजार तर कोहळे यांना २ लाखांचा दंड ठोठावला. सात दिवसांत दंड भरा, अन्यथा सातबारावर नोंद करण्याचा आदेश दिला. तहसीलदार गजभिये यांचा हा तुघलकी आदेश चर्चेचा विषय बनला. याप्रकरणी भार्गव, कोहळे यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेंडे यांच्यासह जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांची भेट घेत वस्तुस्थिती सांगितली. रेतीघाटावर खुलेआम पोकलँड सुरू असल्याची चित्रफित दाखविली.याप्रकरणी जिल्हाधिकारी नवाल यांनी तात्काळ चौकशी लावली होती. ‘लोकमत’ने याबबात रविवारी वृत्त प्रकाशित केले. दरम्यान, उपविभागीय महसूल अधिकारी मनोहर चव्हाण यांच्याकडे सोमवारी आदेशावर स्थगनादेश मिळ्ण्यासाठी अपील दाखल केले. यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थगनादेश दिला. सदर आदेश अत्यंत चुकीचा असल्याची कबुली देत सुनावणीत आदेश खारीज होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यामुळे हा खटाटोप करण्यामागे तहसीलदारांचा हेतू काय, याची सर्वत्र चर्चा आहे. भिष्णूर व वाघोली रेतीघाटातून लाखोची रेती विनारॉयल्टी वाहतूक सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई सोडून बांधकाम करणाऱ्यावर कारवाई का केली जाते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.(तालुका प्रतिनिधी)रेती घाटातून पोकलॅण्डद्वारे उपसा सुरूचभिष्णूर, वाघोली यासह अन्य रेतीघाटातून पोकलॅण्ड व अन्य यंत्रांच्या साह्याने सर्रास रेतीचा उपसा केला जात आहे. असे असताना तहसीलदारांमार्फत बांधकामासाठी आणलेल्या रेतीवर कार्यवाही केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे. वरिष्ठांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.साठेबाजीवरील बंदी घाटधारक व विक्रेत्यांसाठीशासनाने यंदा रेतीचा साठा करण्यास मनाई केली असून तत्सम परवानगी नाकारली आहे. यामुळे रेतीघाट धारक व विक्रेत्यांना रेतीचा साठा करता येत नाही; पण ग्राहकांनाही याचा फटका बसताना दिसून येत आहे.घर बांधकाम करायला रेतीसाठा परवानगीची गरज नाही म्हणून आदेशाला स्थगिती देण्यात आली. या आदेशाला महसूल प्रशासनात महत्त्व नाही. -मनोहर चव्हाण, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.