शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधक उठले वाहनचालकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:01 IST

वाहनांच्या गतीला ‘ब्रेक‘ लावण्याकरिता शहरातील विविध मार्गांवर गतिरोधक लावण्यात आले आहेत. मात्र, ते लावताना कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याने त्याचे नटबोल्ट बाहेर डोकावत असून वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनटबोल्ट डोकावताहेत बाहेर : कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहनांच्या गतीला ‘ब्रेक‘ लावण्याकरिता शहरातील विविध मार्गांवर गतिरोधक लावण्यात आले आहेत. मात्र, ते लावताना कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याने त्याचे नटबोल्ट बाहेर डोकावत असून वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे.काल-परवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर, आर्वी नाका व इतर महत्त्वाच्या, अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी बांधकाम विभागामार्फत कंत्राटदाराने राष्ट्रीय, राज्य मार्गांवर लावले जाणारे रम्बल स्ट्रीप असे मूळ नाव असलेले गतिरोधक लावले आहेत. मात्र, लावताना कमालीचा निष्काळजीपणा करण्यात आल्याने गतिरोधकांचे नटबोल्ट बाहेर डोकावत असून वाहतुकीकरिता ते धोकादायक ठरत आहेत. सोमवारी सकाळी अनेक चारचाकी, दुचाकी वाहने येथे नादुरुस्त झाली. गतिरोधकामुळेच वाहने नादुरुस्त झाल्याने वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसून आले. या गतिरोधकांमधील काही प्लेट्सना तडेही गेले आहेत. या मार्गावरून दिवसाला हजारो लहान-मोठी वाहने वेगाने धावतात. याशिवाय आर्वी नाका व अन्य प्रमुख चौकही वाहतुकीने सदैव गजबजलेले असतात.एका रम्बल स्ट्रीप अर्थात गतिरोधकावर बांधकाम विभागातर्फे मोठा निधी खर्ची घालण्यात आला आहे. १४ हजार रुपये एका रम्बल स्ट्रीपची किंमत असून एकूण सहा ते सात ठिकाणी हे अत्याधुनिक गतिरोधक बसविण्यात आले आहेत. गतिरोधक नीट बसविण्यात न आल्यास वाहतुकीकरिता धोक्याचे ठरणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.‘त्याही’ गतिरोधकांची दुर्दशाअपघातांची मालिका पाहता चार वर्षांपूर्वी केसरीमल कन्या शाळेसमोर दोन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले होते. जड वाहतुकीमुळे कालांतराने या गतिरोधकांची दुर्दशा झाली. यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने डांबराच्या सहाय्याने गतिरोधकांची डागडुजी करण्यात आली. गतिरोधकांच्या फुटलेल्या प्लेट्स आणि त्याचे नटबोल्ट बाहेर आलेले असल्याने तेदेखील वाहतुकीकरिता तापदायक ठरत आहेत. या गतिरोधकांचेदेखील नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.उपअभियंत्यांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणीया प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. ई. मून यांचे लक्ष वेधले असता त्यांनी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क करीत कानउघाडणी केली. तसेच गतिरोधक व्यवस्थित करण्याबाबत निर्देश दिले.