शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

सुरगावच्या रंगाविना धुलिवंदनाची क्रेझ कायमच

By admin | Updated: March 6, 2015 01:56 IST

वृक्षांची होणारी कत्तल, रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम, यापासून बचावाकरिता सारेच प्रयत्नरत आहेत. याकरिता सेलू तालुक्यातील सूरगाव येथील रंगाविना होळी आदर्श ठरत आहे.

प्रफुल्ल लुंगे सेलूवृक्षांची होणारी कत्तल, रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम, यापासून बचावाकरिता सारेच प्रयत्नरत आहेत. याकरिता सेलू तालुक्यातील सूरगाव येथील रंगाविना होळी आदर्श ठरत आहे. कधी एका गावात सुरू झालेली ही परंपरा आज जिल्हाभर सुरू झाली आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरीत झालेल्यांकडून धुनिवंदनाच्या (शुक्रवारी) दिवशी सकाळी प्रभातफेरीसह दिवसभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे. सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या सूरगावातून या रंगाविना होळीची कल्पना अस्तित्त्वात आली. अठरा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने भारावलेल्या व ग्रामगीता आपले जीवन मुल्य मानणाऱ्या सूरगाव येथील गुरूदेव विचारकांचा हा आनंदोत्सव पाहण्यासाठी धुळवडीच्या दिवशी दूरदूरून लोक येतात. गत १८ वर्षांपूर्वी राष्ट्रसंताच्या कार्याने व विचाराने प्रेरीत झालेले सप्तखंजेरीवादक व समाज प्रबोधनकार तसेच सच्चा गुरूदेवप्रेमी प्रवीण महाराज देशमुख या युवकाने पुढाकार घेवून राष्ट्रसंताच्या विचाराचे रोपटे सूरगावात रोवले. सतविचाराने या रोपट्याने बाळसच पकडले असं नाही तर आज त्या विचारांचा वटवृक्ष झाला. धुलिवंदनाच्या तीन दिवसाआधीपासून विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांसह नामधून, योगासने, सामान्य ज्ञान स्पर्धा, सामूदायिक प्रार्थना, शेतकरी मेळावा, सर्वधर्म समन्वय संमेलन आदी कार्यक्रम उत्साहात होतात. धुलिवंदनाच्या दिवशी मुख्य कार्यक्रम होतो. गावात लहानग्यांपासून थोरापर्यंत कोणीही रंग खेळत नाही. गावात चिमुकल्या मुलापासून तर वृध्दापर्यंत महिला पुरुष सर्वच राष्ट्रसंतांच्या विचाराच्या धुळवडीत न्हावून निघतात. गावात लाकूड तोडून होळी पेटत नाही, तर दररोजच्या साफसफाईतून गोळा होणाऱ्या कचऱ्याची होळी पेटविली जाते. धुळवडीच्या दिवशी भल्या पहाटेपासून गावातून नामधून निघते. बाहेर गावावरून आलेले पाहुणेही नामधूनचा आनंद घेतात. गाव दिवाळीसारखे सजविल्या जाते. प्रत्येक घरासमोर संताचे फोटो सजविलेल्या आसनावर ठेवल्या जाते. साडासार्वन करून रांगोळी घातल्या जाते.