शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

सर्वात्मका सर्वेश्वरा, माझे म्हणा...करूणा करा

By admin | Updated: October 31, 2015 03:02 IST

सर्वात्मका सर्वेश्वरा, राम का गुणगान करिये... हे जगत्राता विश्वविधाता... यासह अनेक भक्तीगीतांनी इश्वराला स्वराभिषेक करण्यात आला.

सावंगीच्या साई मंदिर वार्षिकोत्सव : स्वराभिषेकाने श्रोते मंत्रमुग्धवर्धा : सर्वात्मका सर्वेश्वरा, राम का गुणगान करिये... हे जगत्राता विश्वविधाता... यासह अनेक भक्तीगीतांनी इश्वराला स्वराभिषेक करण्यात आला. निमित्त होते, राधिकाबाई मेघे स्मृती न्यास संचालित सावंगी (मेघे) रुग्णालय परिसरातील साई मंदिराच्या वार्षिकोत्सवात आयोजित ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भक्ती व भावगीतांच्या मैफलीचे. यातील सुरेल भाव व भक्तीगीतांनी श्रोत्यांना मुंत्रमुग्ध केले.स्वराभिषेक संगीत संचाद्वारे आयोजित कार्यक्रमाची सुरूवात ‘गगन सदन तेजोमय’ या प्रार्थनागीताने झाली. त्या पाठोपाठ नितीन वाघ यांनी ‘गुरू परतात्मा परेशू’ तर ईशा पारेकर यांनी ‘जय शारदे वागेश्वरी’ हे स्तवनगीत सादर केले. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात नितीन वाघ यांनी सर्वात्मका सर्वेश्वरा, राम का गुणगान करिये, हे जगत्राता विश्वविधाता या भक्तीगीतांसोबतच हे सुरांनो चंद्र व्हा, हे नाट्यगीतही आपल्या दमदार शैलीत प्रस्तुत केले. ईशा पारेकर यांनी प्रभू मी तुझ्या करातील वीणा, राधा कृष्णावरी भाळली, अपार हा भवसागर, अबीर गुलाल उधळीत रंग, मिला दे सखी आदी भक्तीरचना गायल्या. सायली इंगळे हिने संत तुकारामांचा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अभंग, ‘नदीच्या पल्याड’ हा जोगवा तसेच शरदाचे चांदणे या नवनवल नयनोत्सवा, शारदा सुंदर चंदेरी राती, आदी भावगीते व नाट्यगीते सादर केली. डॉ. अनुष्का पारेकर हिने तुम आशा विश्वास हमारे, शंभो शंकरा या भक्तीगीतांसह ‘मथुरेच्या बाजारी’ ही गवळण नितीन वाघ यांच्या सोबत सादर केली. संगीता इंगळे यांनी देव माझा विठू सावळा, केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर आदी रचना गायल्या. कार्यक्रमाची सांगता ‘सोपविले दैव सारे साईनाथा हाती’ या वाघ यांच्या भैरवीने झाली. निवेदन डॉ. उत्तम पारेकर यांनी केले. गायकांना नितीन वाघ, श्याम सरोदे, अनिल पिल्लेवार यांनी संगीतसाथ केली. आभार मधुकर इंगळे यांनी मानले. मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)