शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:31 IST

ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही.

ठळक मुद्देशिधापत्रिका धारक गरजू नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही. शासन, प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध करून देत ती गोरगरीबांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी शिधापत्रिका धारक नागरिकांकडून करण्यात आली आहे.मुख्य सणांच्या दिवसांत बिपीएल कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे. केवळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा तथा बीपीएल कार्डधारकांवर अन्याय करणारा आहे. यामुळे अनेक गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी हे सण साखरेअभावी साजरे करणे कठीण होणार आहे. यामुळे सर्वच कार्ड धारकांना साखर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अनेक बीपीएल कार्ड धारकांच्या शिधापत्रिकांवर अद्याप बिपीएलचा शिक्का मारलेला नाही. यामुळे खरे गरजू बिपीएलच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यांच्या कार्डवर शिक्का मारण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना दारिद्र रेषेखालील यादीत सामावून घ्यावे. यामुळे विधवा, परित्यक्त्या महिला यांना निराधार योजनेचे लाभ घेणे सोईस्कर होऊ शकणार आहे. केसरी कार्ड धारकांना मागील तीन वर्षांपासून धान्य देणे बंद करण्यात आले आहे. त्या सर्व केसरी कार्ड धारकांना धान्य देण्यात यावे. नवीन कार्ड काढताना कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही वर्षभर कार्ड दिले जात नाही. यामुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, ऐपत नसताना त्यांना महागडे धान्य घेऊन गुजराण करावे लागत आहे.कित्येक नागरिकांना वयाची पन्नाशी गाठल्यानंतरही शिधापत्रिकाच उपलब्ध झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही नाव कमी करून आणण्याकरिता सांगितले जाते. अशा नागरिकांना दाखले दिले जात नाहीत. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व नागरिकांकडून शपथपत्र घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्यात याव्या. अर्ज करणाºया नागरिकांना अर्ज केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांत स्वस्त धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.शिधापत्रिकांतील अनागोंदीमुळे गरजू नागरिकांना हक्काच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाचेही या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.