शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

प्रस्तावित उड्डाण पुलांच्या जागेची पाहणी

By admin | Updated: September 26, 2015 02:07 IST

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या तीन रेल्वे उड्डाण पुलांच्या कार्याना गती देण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने खा. रामदास तडस यांच्यासह संबंधित...

रामदास तडस : चमूकडून पुलगाव, वर्धा व सिंदी(रेल्वे) येथे आढावावर्धा : जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या तीन रेल्वे उड्डाण पुलांच्या कार्याना गती देण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने खा. रामदास तडस यांच्यासह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देवून जागेची पाहणी केली. यामुळे रेल्वे उड्डाण पुलाअभावी डोकेदुखी ठरलेल्या समस्यांचा मार्ग मोकळा होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.सकाळी सुरू झालेला हा पाहणी दौरा सायंकाळपर्यंत करण्यात आला. दरम्यान, पुलगाव रेल्वे उड्डाण पूल, वर्धा शहरातील बजाज चौकात रेल्वे उड्डाण पुलाचे विस्तारीकरण, सिंदी रेल्वे येथील प्रस्तावित उड्डाण पूल तसेच हिंगणघाट येथील प्रगतिपथावर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.या चमूने त्यांची पाहणी पुलगाव येथून सुरू केली. त्यानंतर वर्धा व नंतर सिंदी (रेल्वे ) मार्गे जात हिंगणघाट येथील पुलाची पाहणी केली. सिंदी (रेल्वे) नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष, न.प. उपाध्यक्ष, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, आर्वीचे जुमडे, उपअभियंता बोरकर, टाके, कुटे, चव्हाण, शाखा अभियंता मिसाळ, मून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेल्वे उड्डाण पुलाचे कन्सलटंट मोटघरे, रेल्वे विभागाचे अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काळे, पिंपळे हे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.(जिल्हा प्रतिनिधी)पुलगावात ४५ कोटींच्या पुलाला मान्यता पुलगाव येथे ४५ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. मात्र भूसंपादन निगडीत काही कामे प्रलंबित असल्याने सदर कामाला विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भूसंपादन अधिकारी शिरीष पांडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक आयोजित करून योग्य तोडगा काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे उड्डाण पुलाच्या नियोजित जागेची पाहणी खा. तडस यांनी केली. वर्धेच्या पुलाचा मार्ग मोकळा जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने अति महत्त्वाचा पण अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बजाज चौकातील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या विस्तारिकरणासाठीच्या नियोजित जागेची पाहणी केली. या पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयांतर्गत केंद्रीय मार्ग निधी योजनेतून ४५ कोटी रूपयांची मान्यता मिळालेली आहे. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती यावेळी खा. तडस यांनी दिली.सिंदीत प्रस्तावित जागेची पाहणी सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित उड्डाणपुलाच्या नियोजित जागेची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी सर्व बाबींची पूर्तता करूनसुद्धा मुंबई येथे तांत्रिक रेल्वे विभागाकडून अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी खा. तडस यांनी लगेच मुंबई येथील मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सुद यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून प्रकरण लवकर मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या. राष्ट्रीय महामार्गा क्र. ७ वर हिंगणघाट शहरानजीक प्रगतिपथावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलांच्या कामाला विलंब होत असल्याकारणाने अनेक नागरिकांना तासन्तास रेल्वे गेटवर ताटकळत प्रतीक्षा करावी लागते. परिणामी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक नेहमीच विस्कळीत होते. तसेच त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्याबाबत अनेकांकडून वेळोवेळी तक्रारी प्राप्त झाल्याने खासदारांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. कामाला गती देण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तेथील शासकीय विश्रामृहात नगराध्यक्ष पंढरी कापसे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, नगर परिषद सदस्य व अनेक मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीदरम्यान सदर काम ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.