शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचार सरणी आणि चेतना विकास संस्थेच्या सुमन बंग यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 16:13 IST

जेष्ठ गांधी विचार सरणीच्या, भूदान चळवळीसह संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभागी आणि चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात गांधीजींच्या विचारांवर महिलांसाठी प्रक्षिणासह समुपदेशनाचे कार्य करणाऱ्या सुमन ठाकुरदास बंग यांचे कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

सेवाग्राम : जेष्ठ गांधी विचार सरणीच्या,भूदान चळवळीसह संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभागी आणि चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात गांधीजींच्या विचारांवर महिलांसाठी प्रक्षिणासह समुपदेशनाचे कार्य करणाऱ्या सुमन ठाकुरदास बंग यांचे कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी  निधन झाले. त्या ९६ वर्षाच्या होत्या.त्यांना सामाजिक क्षेत्रात सुमनताई अशीच ओळख होती.

      सुमनताई यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ५ मे १९२५ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव‌ सुंदराबाई तर वडील गंगाधर मानपुरे होते. बालवयातच त्यांना कष्ठ करण्याची सवय आणि प्रेरणास्थान  आईच राहिली आहे. मुंबईत वैद्यकिय शिक्षण घेत असताना प्रा‌.ठाकुरदास बंग यांच्याशी विवाह झाल्याने‌ शिक्षण सोडून वर्धेत आल्या. वर्धेत आल्यावर आणि प्रा..ठाकुरदास बंग यांच्या मित्र परिवार व कार्यामुळे जीवनच बदलून गेले. त्यांना गांधी विचारांचे आकर्षक होते पण या ठिकाणी प्रत्यक्ष कार्याच्या रूपाने काम करायला व पाहायला मिळाले हे विशेष.      ठाकुरदास यांच्या सोबत सर्वप्रथम बरबडी नंतर महाकाळ गावात राहून काम करू लागल्या. तिथे साधना सधन संस्थेच्या माध्यमातून स्वावलंबी सामुहिक प्रयोग सुरू केला. याच दरम्यान त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण करून पुढे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

     आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान  चळवळीला सुरूवात झाली. दोघाही पतीपत्नीने गावागावात जाऊन जमीन मागितली. उदार भावनेतून जमीन मिळाली‌. नंतर प्रा.ठाकुरदास बंग सहभागी झाले. नंतर दोघेही आचार्य विनोबा भावे यांच्या सूचनेनुसार ते बिहारला गेले‌. ग्रामदानच्या कामात ते सक्रिय सहभागी झाले. याच दरम्यान साधना सदनचे काम बंद करून त्या मुलांसोबत वर्धेतील महिला आश्रमात राहून शिक्षणाचे काम करू लागल्या. गांधीजींचे भाषण ऐकले, विचार समजावून घेतले मात्र प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. आश्रम जीवन पध्दतीचे संस्कार त्यांच्या दोन्ही  अशोक व डॉ अभय बंग या मुलांना दिले.

     १९७० मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभागी झाल्या. दोनदा सुमनताई यांना तुरूंगवास झाला. कामाचा प्रत्यक्ष दीर्घ अनुभव असल्याने वर्धेत चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले‌. यातून बाल कल्यान व महिला सशक्तीकरण चे काम सुरू केले‌. बचत गट, समुपदेशन यातून संस्थेचा पसारा वाढला. ग्रामीण भागातील महिलांसाठी चेतना विकास मैलाचा दगड ठरला. जवळपास १२५ गावात काम सुरू आहे.    गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन सुमनताई यांनी संस्थेच्या माध्यमातून आपले कार्य अखंड सुरू ठेवले होते. त्या वृध्द असल्या तरी कामालाच सदैव प्राधान्य देऊन ग्रामिण महिलांसाठी अविरत झटणाऱ्या सुमनताई यांनी अखेरचा श्वास कस्तुरबा रुग्णालयात वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला. त्या आलोडी येथील शेतावरील घरी राहात होत्या.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम