शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सुकन्या योजना संभ्रमात

By admin | Updated: July 8, 2015 02:24 IST

स्त्री जन्माच्या स्वागताकरिता शासनाच्यावतीने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीत सुसुत्रता नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे.

जिल्ह्यात ६७४ मुलींची नोंद : पुराव्याअभावी पालकांत गोंधळपराग मगर वर्धास्त्री जन्माच्या स्वागताकरिता शासनाच्यावतीने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीत सुसुत्रता नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी करणाऱ्या पालकांकडे कुठलाही पुरावा नसल्याने मिळणारा लाभ कुठे व कसा मिळेल या संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे १ जानेवारी २०१४ रोजी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. या तारखेनंतर जन्मलेल्या अर्थिक दुर्बल घटकातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागातून ५५० तर शहरी भागातून १२४ मुलींची सुकन्या म्हणून नोंदही कारण्यात आली आहे. योजनेत नोंद करणाऱ्या मुलीला तिच्या वयाच्या १८ व्या वर्षी एक लाख रुपये मिळणार आहेत. १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेल्या मुलींच्या नावे जन्मत:च एक वर्षाच्या आत २१ हजार २०० रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे ‘जन्मत: मुलगी लाखाची धनी’ असा प्रचार योजनेमार्फत झाला. एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांना अशा मुली शोधत त्यांच्या पालकांकरवी योजनेचा अर्ज भरून घ्यावयाचा आहे; परंतु अर्ज भरताना ही रक्कम कशी मिळेल, त्यासाठी नंतर काय करावे याची कुठलीही माहिती पालकांना देण्यात येत नाही. समाजोपयोगी असलेल्या या योजनेबाबत शासनाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही विशेष माहिती नसल्याने ती कुचकामी ठरत आहे. योजनेत एकात्मिक बाल विकास प्रकल्पात नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग आहेत. यातील शहरी भागाची माहिती एकात्मिक विकास प्रकल्प (नागरी) तर ग्रामीण भागाची माहिती जि.प. अंतर्गत पाठविली जाते. यामुळे गोंधळ उडत आहे.जिल्ह्यातील एकही प्रकरण आयुर्विमा महामंडळात नाही ?मुलगी जन्मत: या योजनेत एक वर्षाच्या आत तिच्या नावे २१ हजार २०० रुपये आयुर्विमा महामंडळात जमा केले जाणार होते. जि. प. वर्धा येथील महिला व बालकल्याण विभागाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीवरून ५५० नावे नागपूर विभागाकडे पाठविण्यात आली. यातील एकाही प्रकरणात ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे जमा होणारे २१ हजार २०० रुपये गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधितांकडून केवळ माहिती नागपूर विभागाला पाठविल्याचे सांगण्यात येते. यामुळे योजनेच्या संकल्पनेवरच प्रश्न निर्माण होत आहे. केवळ आधार कार्डाचाच पुरावा अर्ज भरताना शासकीय निकषाप्रमाणे आई वडिलांचा रहिवासी दाखला, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र आणि दुसरे अपत्य असल्यास कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र आदीची पूर्तता करणे आवश्यक आहे. यात मिळणाऱ्या रकमेबाबत अधिकारी केवळ आधार कार्डाचा पुरावा देत आहेत. आधारद्वारे संपूर्ण माहिती शासनाकडे राहणार असल्याचे सांगण्यात येते. आधारचा घोळ बघता आणि पैसे जमा होण्याची कुठलीही ठोस व्यवस्था नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.