शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या प्रकरणात महिनाभरानंतर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 2, 2017 01:07 IST

मुलाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवलेली दुचाकी परत द्यावी म्हणून विनंती केली असता जादा पैशाची मागणी केली.

कर्ज फेडण्याच्या तगाद्याने रेल्वेसमोर आत्महत्या लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मुलाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवलेली दुचाकी परत द्यावी म्हणून विनंती केली असता जादा पैशाची मागणी केली. यामुळे पुलगाव येथील मनोज पाटील यांनी दहेगाव (स्टे.) रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेगाडीसमोर येत आत्महत्या केली. ही घटना १० मे रोजी घडली. या प्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यातही सावकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले नसल्याने पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. रेल्वे पोलिसांनी तपास करीत मनोजजवळ मिळालेल्या चिठ्ठीवरून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल न करता टाळाटाळ केली. महिनाभराच्या कालावधीनंतर पुलगाव पोलिसांत १७ जून रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन कालावधी लोटला; पण आरोपीला अटक केली नाही. जवाहर कॉलनी येथील मनोज पाटील यांनी काही कामानिमित्त नितीन गुप्ता याच्याकडून ६ टक्के व्याजाने २० हजार रुपये घेतले होते. पैशाच्या मोबदल्यात गुप्ताने त्यांची दुचाकी गहाण ठेवली होती. गाडीचे कागदपत्र व कोरा धनादेशही घेतला. काही दिवसांनी त्यांनी २५ हजार रुपये परत केले; पण गुप्ता याने अधिक पैशाची मागणी करून दुचाकी देण्यास नकार दिला. मनोजने गुप्ताला विनंती केली; पण त्याने दुचाकी दिली नाही. याच चिंतेत मनोजने रेल्वेखाली येत आत्महत्या केली. जाचामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट असताना गुन्हा का दाखल करण्यास विलंब का, हा प्रश्नच आहे. अद्याप आरोपी मोकाट असून मनोजचे कुटुंब उघड्यावर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. चिठ्ठीत काय होते रेल्वे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी पंचनामा केला असता मनोजच्या खिशात चिठ्ठी मिळाली. त्यात ‘मी नितीन गुप्ता याच्याकडून ६ टक्के व्याजाने २० हजार रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात त्याने माझी दुचाकी गहाण ठेवली होती. मी त्याला ९ आॅक्टोबर २०१६ रोजी ५ हजार, १७ फेब्रुवारी रोजी १० हजार व ९ मे रोजी १० हजार असे २५ हजार रुपये परत केले. मी गाडी परत मागितली असता त्याने नकार देत ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. मुलाच्या शिक्षणाला गाडी पाहिजे असून एवढे पैसे देण्याची ऐपत नाही. यामुळे मी आत्महत्या करीत असून याला नितीन गुप्ता जबाबदार आहे’, असे नमूद केले आहे.