शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या ही मनोसामाजिक आणि जैविक घटना

By admin | Updated: February 8, 2017 00:45 IST

आत्महत्या ही अचानक होत नाही. ती मनोसामाजिक घटनेसोबतच जैविक व जनुकीयसुद्धा आहे.

प्रवीण खैरकार : ‘सामाजिक विघटनातून युवकांच्या वाढत्या आत्महत्या’ विषयावर चर्चासत्र सेवाग्राम : आत्महत्या ही अचानक होत नाही. ती मनोसामाजिक घटनेसोबतच जैविक व जनुकीयसुद्धा आहे. यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीच्या ठायी विविध तऱ्हेची लक्षणे दिसतात. एकदा का त्याच्या मेंदूत या तऱ्हेचा विचार आला तर त्या अनुषंगाने त्याच्या वर्तनात, विचारात आणि व्यवहारात बदल होत जातो आणि व्यक्ती स्वत:ला संपवायला लागतो, असे मत डॉ. प्रवीण खैरकार यांनी व्यक्त केले. ‘युवकांतील वाढत्या आत्महत्या’ हा चिंतेचा विषय आहे. सेवाग्राम परिसरात गत दोन वर्षांत १५ ते २२ वर्षांच्या युवकांनी केलेल्या आत्महत्या या अनुषंगाने नई तालीम समितीतर्फे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. डॉ. खैरकार यांनी ‘दुर्खीम’ने केलेल्या चार वर्गीकरणाचा आधार घेत व जगभरातील आत्महत्येच्या अनुषंगाने झालेल्या संशोधनाच्या आधारे त्यांनी मेंदूची केंद्र व त्यातील नुरोन्सच्या कार्यपद्धती समजावून सांगितल्या. यात झालेल्या असंतुलनामुळे व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. याचा विचार करून तो त्यानुसार यंत्रणा निर्माण करतो व शेवटच्या क्षणी निर्णय ेघेतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मानसोपचार विभागाच्या डॉ. स्रेहा, डॉ. राजेश, डॉ. विनय, डॉ. स्वाती, डॉ. गिरीष व डॉ. विवेक यांनी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची १० लक्षणे व उपाय यावर विस्ताराने विवेचन केले. चर्चासत्राला सेवाग्राम गावातील १६५ महिला व पुरूष उपस्थित होते. यातच ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या ते पाच कुटुंबही उपस्थित होते. प्रास्ताविक करीत भूमिका, औचित्य व वैद्यकीय संकल्पना समजाविण्याचे कार्य डॉ. सुगन बरंठ यांनी केले. संचालन करीत आभार नई तालीमचे प्रभाकर पुसदकर यांनी मानले. कार्यक्रमाला आनंद निकेतनचे सुषमा शर्मा व शिक्षक, सेवाग्रामच्या सरपंच रोशना जामलेकर, नारायण देवतळे, गीता कुमारे, अ‍ॅड. अशोक गांजरे, रोहित मेश्राम, किशोर भोयर, सुंदरा धाबर्डे, मंगन संग्रहलयाच्या भावना डगवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ. शिवचरण ठाकूर, संदीप भगत, रूपेश कडू, विनय करूळे, पवन भाई व युवकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)