विनयभंग प्रकरण : तपासाकडे वर्धेकरांचे लक्षवर्धा : एक पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या वाहन चालकाने पोलीस शिपायाच्या मुलीचा बोर व्याघ्र प्रकल्प पसिरातील एका हॉटेलात विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचे अनेक गोरखधंदे आता चवीने चर्चिले जात आहे. अटकेतील आरोपीची पोलीस अधीक्षकांनी कसून चौकशी केल्यास आतापर्यंत केलेल्या धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. याच महिन्यात प्रियकरासोबत बोरला गेलेल्या युवतीवर बलात्कार झाल्याची चर्चा आहे. मात्र बदनामीपोटी ती तक्रारीला घाबरत असल्याचे समजते.
‘त्यांच्या’ गोरखधंद्याच्या अशाही गाथा
By admin | Updated: June 26, 2015 02:02 IST