शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सबस्टेशनचा बोजवारा

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

येथे वीज वितरण कंपनीचे ३३ के.व्ही.चे सबस्टेशन असून त्या बसस्टेशनचा सध्यातरी कोणी वाली नसल्याने येथील कारभार रामभरोसे काम सुरू आहे.

पाणी असून विजेअभावी पिकांचे नुकसान : अधिकारी नसल्यामुळे रामभरोसे कारभारविजयगोपाल : येथे वीज वितरण कंपनीचे ३३ के.व्ही.चे सबस्टेशन असून त्या बसस्टेशनचा सध्यातरी कोणी वाली नसल्याने येथील कारभार रामभरोसे काम सुरू आहे.विजयगोपाल येथून अभियंता फाळे यांची यवतमाळ येथे बदली झाली. आॅगस्टमध्ये ते आपला प्रभार सोपवून यवतमाळला रूजू झाले. तेव्हापासून या सबस्टेशनला हक्काचा अधिकारी मिळालेला नाही. तेथील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. सबस्टेशनला एखाद्या शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरुन फोन केल्यास एक तर फोन उचलत नाही आणि उचलला तर तेथील चौकीदार फोन उचलतात. त्यामुळे शेतकऱ्याला जी माहिती पाहिजे, ती बरोबर मिळत नाही. या सबस्टेशनचा अतिरिक्त भार नाचणगाव येथील अभियंता तिमांडे यांच्याकडे आहे. तेसुद्धा मोबाईल उचलण्यास तयार नसतात. वीज वितरण कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीचे सीमकार्ड दिले, पण त्या सीमचा ग्राहकाला कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. तसेच कंपनीच्या नियमानुसार कार्यालयाच्या बाहेर फलकावर संपूर्ण कर्मचाऱ्याचे मोबाईल नंबर लिहण्याचे आदेश आहे. तेही आदेश धाब्यावर ठेवलेले आहे. सबस्टेशनमधील संपूर्ण कर्मचारी बाहेरगाऊन ये-जा करतात. त्यामुळे कार्यालयीन वेळेत पोहचत नाही. शासनाच्या नियमानुसार कंपनीच्या संपूर्ण कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहण्याचा आदेश आहे. तोही आदेश धाब्यावर ठेवला आहे. कर्मचारी राहत नसल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही. येथे नियमित अधिकारी नसल्यामुळे येथील कारभार रामभरोसे सुरु आहे.(वार्ताहर)