शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:44 IST

मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रहारची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.मागील काही दिवसांपासून हवामान खाते रोज काहीतरी खोटनाट बोलून शेतकरी व जनतेची बोळवण करीत आहे. मागील एक महिन्यांपासून आज किंवा उद्या पाऊस येईल, सहा दिवसांनी मान्सूनचे आगमन होईल, असे सांगत आहे. तर कधी १५ जुलै नंतर पावसाची शक्यता याच हवामान खात्याने वर्तविली होती. हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशीची लावण केली आहे. परंतु, अद्यापही जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. हवामान खाते उलटसुटल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांना नापिकी तसेच दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे खोटे बोलणाऱ्या हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे, भुषण येलेकार, वैभव शेंडे, रोशन दाभाडे, दादा बोरकर, प्रशिल धांदे, शुभम भोयर, प्रितम कातकीडे, नितीन काटकर, सचिन कोळसे, विवेक ठाकरे, बीपीन मोघे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी