शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मंजुरीचा विषय ऐरणीवर

By admin | Updated: June 30, 2016 02:19 IST

शहरालगतच्या अकरा ग्रा.पं. च्या हद्दीतील घर बांधकामासाठी परवानगी मिळविताना आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बाईक रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना साकडेवर्धा : शहरालगतच्या अकरा ग्रा.पं. च्या हद्दीतील घर बांधकामासाठी परवानगी मिळविताना आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वर्षांपासून खोळंबलेल्या घर बांधकाम परवानग्या सुरू करण्यात आल्या; पण प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत नियम शिथील करून जनतेला सहज परवानगी मिळावी म्हणून जन समुदाय मंचाद्वारे मोटारसाकल रॅली काढण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रॅली सकाळी ११ वाजता आर्वी नाका येथून निघून शिवाजी चौक, बजाज चौक, आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.अकरा ग्रामपंचायतीच्या बांधकाम मंजुरीची प्रक्रिया नगर रचनाकार कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. या कार्यालयाने गरजुंना नियमांच्या नावावर त्रास देणे सुरू केले आहे. एक हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या एनएटीपी मंजूर ले-आऊट मधील प्लॉटधारकाला नगर रचनाकार कार्यालयाद्वारे बांधकाम मंजूरी दिली जात नाही. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी मंजूर केलेल्या ले-आऊटमधील प्लॉटवर बांधकाम परवानगी दिली जात नाही. हे कोणत्या नियमांतर्गत केले जाते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केल्यास उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. प्लॉटची किंमत शून्य समजून प्रकरण घर बांधणीसाठी विचारात घेतले जात नाही. अशा ले-आऊटमधील प्लॉट-धारकांना बँकाही कर्ज देत नाही. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जन समुदाय मंचाद्वारे करण्यात आली आहे.बाईक रॅली व निवेदन देताना मंचाचे सचिन खंडारे, संजय जाधव, प्रवीण काळे, विशाल ठेंगडी, संजय किनगावकर, दीपक चुटे, सुधाकर चामलाटे, मनोज गायकवाड, मनोज पांडे, छोटू धोपाडे, अनिल भिसे, आशिष भिसे, नामदेव भोयर, संजय भोयर, मनोज ढगे, राजू शेंदरे, नेहारे, लोंदासे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)