शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

उपबाजारपेठेत शुभारंभालाच ४ हजार ५०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:19 IST

सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेत सोमवारी सकाळी १०.३१ वाजता कापूस लिलावाचा शुभारंभ सभापती लिलाधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : लिलाव पद्धतीनेच कापूस विकण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेत सोमवारी सकाळी १०.३१ वाजता कापूस लिलावाचा शुभारंभ सभापती लिलाधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समितीचे गुणवंत कडू, दिलीप ठाकरे, दिलीप भजभुजे, संदीप वाणी, काशीनाथ लोणकर, कौरती, शीला धोटे व संचालक हजर होते.शुभारंभाला २५ वाहन कापूस घेऊन शेतकरी हजर झाले होते. लिलावात कापसाचे दर ४ हजार ५११ रुपये निघाले. भारतीय कापूस निगमचे अडते, ग्रेडर हे देखील हजर होते. सीसीआय यांनी तीन वाहनांतील कापूस खरेदी केला. सर्व शेतकºयांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. लिलावामध्ये कापूस व्यापारी साईनाथ टेक्सटाईल्स जुवाडी, साईगोल्ड जिनिंग फॅक्ट्री, एस.आर. जिनिंग फॅक्ट्री, गिरीराज जि. फॅक्ट्री, संस्कार उद्योग सेलू आदींनी भाग घेतला. याप्रसंगी संचालक गुणवंत कडू, संदीप वाणी, शिला धोटे, दिलीप भजभूजे आदी उपस्थित होते. यावेळी सीसीआयनेही कापूस खरेदी केली. यावेळी सभापती वानखेडे यांनी आपला कापूस लिलावाद्वारे विक्री करावा. यातून शेतकºयांना अधिक दर मिळणार आहे. कापूस लिलावातच आणून विकावा. शेतकºयांनी आपला कापूस विक्रीकरिता आणताना चांगला कापूस व हलका कापूस पडदा करून आणावा. यामुळे योग्य दर देणे सोयीचे होते, असे सांगितले.आमदारांच्या हस्ते शेतकºयांचा सन्मानवर्धा - सेलू तालुक्यातील जुवाडी येथील साईनाथ टेक्सटाईल प्रा.लि. येथे गुरूवारपासून कापूस खेरदीचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम कापूस आणणाºया शेतकºयांचा आ.डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकºयांना शाल-श्रीफळ व स्वेटर देण्यात आले. पहिया दिवशी कापसाला ४३५१ रुपये भाव देण्यात आला. यात ७३ गाड्यांची आवक झाली असून ८५१.५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यावेळी प्रेम ग्रोव्हर, जि.प. महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पंं.स. सभापती जयश्री खोडे, सेलू तालुका भाजपाचे अध्यक्ष अशोक कलोडे, शिवाजी पाटील, निरज अंसारी, रणजीत काटे, किसान मोर्चाचे विलास वरटकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरिष पारसे, जि.प. सदस्य विनोद लाखे, माजी जि.प. सदस्य अरुण उरकांदे, पं.स सदस्य अशोक मुडे, बंडु गव्हाळे, सरपंच प्रीती गव्हाळे, भावना करनाके, छाया दुर्गे, सरला भांडेकर, अभय ढोकणे, नंदा मंगाम, जोत्सना पोहाणे, सुषमा तरवरे, अर्चना सलाम, रवी बेसेकर, शंकर धुर्वे, जीवन येळणे आदी उपस्थित होते.