शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आॅटो चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाचा बडगा

By admin | Updated: July 31, 2016 00:48 IST

खासगी वाहनातून होत असलेली प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याचे कारण पूढे करीत

कारवाई नियमबाह्य : संघटनेचा आरोप, आमदारांना साकडे वर्धा : खासगी वाहनातून होत असलेली प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याचे कारण पूढे करीत उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे सेलू तालुक्यातील हिंगणी येथील आॅटो चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमाला अनुसरून नसल्याचे सांगत आॅटो चालक संघटनेने शनिवारी आ.डॉ. पंकज भोयर यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार, हिंगणी येथील आॅटोचालक सुशिक्षित बेरोजगार आहे. या परिसरात दुसरा कोणताही व्यवसाय नसल्याने याच व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. हा व्यवसास गत १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. येथील आॅटो रिक्षा चालक कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करीत नाहीत. प्रामाणिकपणे आपला व्यवयास करीत आहेत. अशात गत एक वर्षापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून हेतुपुरस्सर ‘हिंगणी परिक्षेत्रातील’ आॅटो जप्त करण्याचा धडाका सुरू आहे. जप्त केलेले आॅटो सेलू पोलीस ठाण्यात घेऊन जात चालकांकडून पाच ते सहा हजार रुपये दंड उकळला जात आहे. हा दंड भरल्यानंतर एक महिन्याने आॅटो सोडण्यात येत असल्याचे चालकांनी निवेदनात नमूद केले आहे. या कारवाईमुळे आॅटो रीक्षा चालक मालक हवालदिल झाले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय नसल्याने आता आम्हीही आत्महत्या करावी काय, असा संतप्त सवाल त्यांनी निवेदनातून केला आहे. आ.डॉ. भोयर यांना निवेदन देताना आॅटो युनियन अध्यक्ष किशोर बावणे, श्रीकांत नांदेकर, प्रीतम पाटील, विजय मनने, अनिल मोहरले, झिरीया, नरेश वाटगुळे, जावेद शेख, बाबाराव चौधरी, राहुल सहारे, महेश लाकडे, अजय येनकर, जावेद शेख जावेद झिरीया, मजिद शेख यांच्यासह आॅटो मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)