शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

जात प्रमाणपत्रासाठीची विद्यार्थ्यांची परवड थांबणार

By admin | Updated: February 9, 2016 01:47 IST

शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता जात, उत्पन्न, अधिवास व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी धावपळ होते.

सुट्यांत शिबिर : शाळेतच मिळणार प्रमाणपत्र वर्धा : शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता जात, उत्पन्न, अधिवास व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी धावपळ होते. यावर मार्ग काढत वर्धेत आता शाळेतच शिबिराचे आयोजन करून आवश्यक प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपविभागीय कार्यालयासह तहसील कार्यालयात एकाच वेळी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. यात काहींना आवश्यक प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही. याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत होती. यावर मार्ग काढण्याकरिता आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांची सभा विश्राम भवन येथे पार पडली. या सभेत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शाळेतच देण्यासाठी शिबिर घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.विद्यार्थ्यांची दरवर्षी जातीचे प्रमाणपत्र, अधिवास, उत्पन्न व अन्य कागदपत्र काढण्यासाठी त्रेधातिरपट उडत असते. शैक्षणिक सत्र सुरू होताना तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची झुंबड निर्माण होते. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचाही धोका असतो, ही बाब लक्षात घेवून विश्राम भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तहसीलदार राहुल सारंग, शिक्षणाधिकारी प्राथमिक धनराज तेलंग यांच्यासह शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी आ. डॉ. भोयर यांनी सांगितले की विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र शाळेतच काढण्यात यावे. राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान मोहिमेंतर्गत प्रत्येक शाळेत विशिष्ट शिबिर घेण्याबाबत सूचना केल्या. त्यांच्या या सूचना अधिकारी व मुख्याध्यापकांनी मान्य केल्या. या शिबिरात प्रमाणपत्राकरिता आवश्यक कागदपत्रे एकत्र करून संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे गोळा करून ती तयार ठेवावीत. दहावीची परीक्षा असल्याने शिबिर एप्रिल महिन्यापासून घेण्याचेही सभेत ठरले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची यादी व कागदपत्रांची यादी बनवावी. कागदपत्रे गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळ देण्यात यावा. तशी सुचना फलकावर लावण्यात यावी, अशी सूचना यावेळी देण्यात आल्या.सभेत मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्रासंबंधी येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यावर मार्ग काढण्याचेही आमदार म्हणाले.(प्रतिनिधी)