शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बंद बसफेरीमुळे विद्यार्थ्यांची पायपीट

By admin | Updated: August 3, 2016 01:19 IST

हिंगणी-बोरधरण मार्गावरील दोन पुलांचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे गावातील बसफेरी बंद झाली आहे.

सेलू : हिंगणी-बोरधरण मार्गावरील दोन पुलांचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे गावातील बसफेरी बंद झाली आहे. परिणामी येथील विद्यार्थ्यांची पायपीट सुरू झाली आहे. पावसाळ्यात या मार्गावरील पर्यायी वळण रस्त्यावरील सिमेंट पाईपवर टाकलेला मुरूम वाहून गेला. काळ्या मातीमुळे या मार्गावर चिखल झाल्याने बोरधरण येथे जाणारी बसच गावात येत नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फटफजीती झाली आहे. हिंगणीपासून बोरधरणकडे जाताना जवळपास १ कि.मी अंतरावर दोन पुलांचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम कासवगतीने होत असल्याचे दिसते. संबंधीत विभाग आणि कंत्राटदार यांच्याकडून काम पूर्ण करण्याबाबत सतत दुर्लक्ष केले जाते. उन्हाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक असताना तसे झाले नाही. आता त्याचे परिणाम येथील गावकऱ्यांना भोगावे लागत आहे. या पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून केलेला सिमेंट पायल्यांचा पूल खचला. त्यामुळे चिखल झाला आहे. आता नियमीत जाणारी बोरधरण बस बंद आहे. बोरी (कोकाटे), बोरधरण येथील विद्यार्थ्यांना बसअभावी खाजगी वाहनांचा आधार घेत शिक्षणासाठी सेलू व वर्धा व इतरत्र जावे लागते. या समस्ये संदर्भात लोकप्रतिनिधी चुप्पी साधून असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. बोरी (कोकाटे) येथील राजेंद्र कोकाटे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी तक्रार करीत पुलाचे काम पूर्ण करून बस सुरू करण्याबाबत कैफीयत मांडली. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी) खासगी वाहनांचा आधार बोरी (कोकाटे), बोरधरण येथील विद्यार्थ्यांना बसअभावी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. गावातील बसफेरी पावसाळ्यात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय येथे जाण्याकरिता खासगी वाहनांशिवाय पर्याय नसतो. अनेकदा विद्यार्थी वाहन न मिळाल्यास अडकुन पडतात. यावर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.