शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

चोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: January 31, 2016 02:13 IST

शाळेतील सहकारी विद्यार्थिनीचा मोबाईल चोरल्याचा आळ असह्य झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून ....

संतप्त नागरिकांची मृतदेहासह शाळेवर धडक वर्धा : शाळेतील सहकारी विद्यार्थिनीचा मोबाईल चोरल्याचा आळ असह्य झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी रात्री येथील गजानन नगरात घडली. निकिता वाल्मिक अंड्रसकर (१६) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. निकिताने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तिच्यावर शिक्षिकेने चोरीचा आळ लावल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणी रामगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा केसरीमल कन्या शाळेतील तिच्या वर्गशिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकेकडून मिळालेल्या वागणुकीमुळे दुखावलेल्या निकिताच्या आत्महत्येमुळे संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी जोपर्यंत शिक्षिकेला अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी सदर शिक्षिकेला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह थेट शाळेत आणण्यात आला. सदर वर्गशिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील शिक्षिकेशी चौकशी करून तिच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिल्यानंतर वातावरण निवळले. संबंधित शिक्षिका रजेवर असल्याचे समोर आले. शिवाय या चोरी प्रकरणाची कुठलीही माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकेला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यानंतर निकिताचा मृतदेह घरी नेण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदाबस्त ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत या प्रकरणातील दोषी शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनातून केली. सदर निवेदन पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी स्वीकारले. या निवेदनानुसार निकीताच्या वर्गशिक्षिकेकडून तिला सतत त्रास होत होता. शिवाय या चोरीच्या प्रकरणातून वाचण्याकरिता घरकामाला येण्याची धमकी तिला देण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उपस्थित संतप्त नागरिकांकडून करण्यात आली. वर्गशिक्षिकेवर गुन्हा दाखल वर्धा : गजानननगर येथे निकिता अंड्रसकर नामक विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावरून पोलिसांनी गजानननगर येथे घटनास्थळ गाठत पाहणी केली. तिने घरी कुणी नसताना राहत्या घरी गळफास लावल्याचे दिसून आले. निकिताचे वडील मिस्त्रिकाम करतात तर तिची आई सूतगिरणीत कामाला जात असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळाच्या पंचनाम्यात निकिताने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. यात तिच्यावर तिच्या वर्ग मैत्रिणीचा मोबाईल चोरल्याचा आळ आणल्याचे नमूद होते. ती मोबाईलची रक्कमही गोळा करीत असल्याचाही उल्लेख आहे. यासाठी वर्गशिक्षिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यावरून रामनगर पोलीस ठाण्यात वर्गशिक्षिकेवर भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विजय मगर यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.