शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी घेतले भारतीय शेतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:04 IST

धरामित्र संस्था वर्धा व दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाशी संलग्न ‘सस्टेनेबिलिटी इंस्टीट्युट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्यारेटीव्ह स्टडीज इन रिजनरेटीव्ह फूड सिस्टम्स’ विषयावरील दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेच्या ११ प्रशिक्षणार्थी तसेच, ब्राझील व आॅस्ट्रेलिया येथील प्रशिक्षणार्थ्यांनी भारतीय शेतीची माहिती जाणून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धरामित्र संस्था वर्धा व दक्षिण आफ्रिकेतील स्टेलेनबॉश विद्यापीठाशी संलग्न ‘सस्टेनेबिलिटी इंस्टीट्युट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कम्प्यारेटीव्ह स्टडीज इन रिजनरेटीव्ह फूड सिस्टम्स’ विषयावरील दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. सदर कार्यशाळेत दक्षिण आफ्रिकेच्या ११ प्रशिक्षणार्थी तसेच, ब्राझील व आॅस्ट्रेलिया येथील प्रशिक्षणार्थ्यांनी भारतीय शेतीची माहिती जाणून घेतली.सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना गेल्या ५० वर्षात भारतात झालेले शेतीतील बदल, भारतीय शेतीपुढील आवाहने, शेतीतील नवीन प्रयोग व त्या दिशेने होत असलेले प्रयत्न याबाबत माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेत तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, क्षेत्रभेटी, प्रयोगशील शेतकºयांशी संवाद आदी उपक्रमे राबविण्यात आले. कार्यशाळेत धरामित्र संस्थेचे अध्यक्ष व जैववैज्ञानिक डॉ. तारक काटे, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. वेणू गोपालन, शेती अभ्यासक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विजय जावंधिया, अंकुर सीड्सचे संचालक रवी काशीकर, अभ्यासक अपर्णा पल्लवी, डॉ. उल्हास जाजू, मगनसंग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता, जीवशास्त्रज्ञ सोनाली फाटे यांनी मार्गदर्शन केले. विदेशी पाहूण्यांनी यशस्वीरित्या सेंद्रीय शेती करणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सुभाष शर्मा व वर्धा जिल्ह्यातील शेतकरी दीपक बर्डे यांच्या शेताची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच आर्वी तालुक्यातील शेतकºयांसोबतचे कार्य, गाव परिसरात उभारलेल्या परसबागा, काकडदरा येथील पाणी फाऊंडेशन पुरस्कृत वॉटर कप स्पर्धेअंतर्गत लोकसहभागातून करण्यात आलेले मृदा व जलसंधारणची कामे, सेवाग्रामजवळील दुग्ध उत्पादन व दुध संकलन, रामनगर येथील गोरस भांडार मधील दुग्ध संकलन, वितरण व विविध दुग्धजन्य खाद्य पदार्थ निर्मिती, मगन संग्रहालयातील विविध ग्रामोपयोगी उपक्रमाची माहिती या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांनी जाणून घेतली. कार्यशाळेचा समारोप माजी प्राचार्य अ‍ॅड. अशोक पावडे यांच्या उपस्थितीत झाला.