शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निर्देशानंतरही विद्यार्थ्याच्या अटकेचे नाट्य

By admin | Updated: February 9, 2017 00:36 IST

महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील २०१२ मधील एका प्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी

सेवाग्राम पोलिसांचा प्रताप : उपोषण करीत केली कारवाईची मागणी वर्धा : महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील २०१२ मधील एका प्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता राजीव सूमन या विद्यार्थ्याला अटक केली. ही अटक बेकायदेशीर असल्याने ट्रिब्यूनलचे सदस्य जम्मू आनंद यांनी रात्री ९ वाजता म. गांधी पुतळ्याजवळ उपोषण केले. शिवाय पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार करीत कारवाईची मागणी केली. ठाणेदारांनी लेखी ग्वाही दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. सेवाग्राम पोलिसांनी केलेल्या या अटक नाट्याचा बुधवारी पत्रकार परिषदेतून निषेध नोंदविण्यात आला. किसान अधिकार अभियानच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेला अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, ट्रीब्यूलनचे सदस्य जम्मू नारायण आनंद, विद्यार्थी राजीव सूमन, संजीव चंदन, अशोक मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी जम्मू आनंद म्हणाले की, २०१२ मध्ये महात्मा गांधी विद्यापीठात शिकणाऱ्या राजीव सूमन व संजीव चंदन या विद्यार्थ्यांविरूद्ध तत्कालीन कुलपती विभूती नारायण राय व प्रशासनाने पोलिसांत तक्रार केली होती. मायग्रेशन सर्टीफिकेट बोगस असल्याच्या या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. यावर विद्यार्थ्यांनीही विद्यापीठ प्रशासनाविरूद्ध तक्रार केली होती. हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाच्या दबावामुळे पोलिसांकडून बंद करण्यात आले होते; पण विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने पोलिसांना विद्यार्थ्यांना अटक करण्यात येऊ नये व विद्यापीठ प्रशासनावर कारवाई करावी, असे आदेश दिले. शिवाय तीन सदस्यीय समिती (ट्रीब्यूनल) गठित करून चौकशी करण्याबाबतही आदेशित केले. यावरून महामहीम राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, विद्यापीठ प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी, अशी समिती तयार करण्यात आली. या समितीची चौथी सुनावणी महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात मंगळवारी होती. यासाठीच राजीव सूमन, संजीव सूमन व ट्रीब्यूनलचे सदस्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जम्मू आनंद हे विद्यापीठात दाखल झाले होते. सुनावणी आटोपल्यानंतर बाहेर पडताच सेवाग्राम पोलिसांनी राजीव सूमन यांना अटक करून पोलीस ठाण्यात आणले. न्यायालयाचे आदेश असताना ही कारवाई योग्य नव्हती; पण विद्यापीठ प्रशासनाच्या सांगण्यावरून सेवाग्राम पोलिसांनी कारवाईचे अस्त्र उगारले.