शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चित्तथरारक कवायतींनी विद्यार्थी थक्क

By admin | Updated: January 3, 2017 01:16 IST

अंगावरून जाणारी दुचाकी, वेळी-अवेळी आलेल्या प्रसंगांना सामोरे जाणारे पोलीस, गोळीबार आदी गोष्टी अनेकांनी

‘पोलीस रायजिंग डे’निमित्त कार्यक्रम : चिमुकल्यांना दिली कामकाजाची माहिती वर्धा : अंगावरून जाणारी दुचाकी, वेळी-अवेळी आलेल्या प्रसंगांना सामोरे जाणारे पोलीस, गोळीबार आदी गोष्टी अनेकांनी हिंदी सिनेमात अनुभवल्या आहेत. हेच चित्तथरारक दृश्य वर्धा पोलिसांनी करून दाखविल्याने विद्यार्थी थक्क झाले. निमित्त होते, पोलीस रायजींग डे चे! या दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना पोलीस विभागात होणाऱ्या कामांची माहिती देण्यात आली. यावेळी केसरीमल कन्या शाळा, न्यू इंग्लिश शाळा, रत्नीबाई विद्यालय, महिला आश्रम विद्यालय येथील ३०० विद्यार्थी व त्यांचे शिक्षक उपस्थित होते. पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर बुलेट वाहनाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच धनूर्विद्या, कराटे यांचेही प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. वर्धा जिल्हा पोलीस दलाकडे असलेली अत्याधुनिक हत्यारे व दारूगोळा यांचे प्रदर्शन दाखविण्यात आले व त्याची माहितीही देण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्या कार्यालयाला भेट देऊन तेथे करण्यात येत असलेल्या कामाबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. वाहतूक नियमांबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला १५० पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी प्रात्याक्षिके करून उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनींना विविध विषयाची माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरिता पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय रवींद्र किल्लेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, राखीव पोलीस निरीक्षक एस.पी. ठवरे यांनी कामगिरी केली.(प्रतिनिधी) जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांतही कार्यक्रम ४पोलीस रायजींग डे निमित्त जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पुलगाव, देवळी, आर्वी, आष्टी (श.), कारंजा (घा.), समुद्रपूर, हिंगणघाट, दहेगाव (गो.), सिंदी (रेल्वे), गिरड, अल्लीपूर, वडनेर, सेलू, तळेगाव (श्या.पं.), खरांगणा (मो.), रामनगर, सावंगी (मेघे) व सेवाग्राम पोलीस ठाण्यांत तेथील पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांना तथा नागरिकांना पोलिसांच्या कार्याची माहिती देण्यात आली.