शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक निर्मूलनासाठी विद्यार्थीही सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:18 IST

स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.

ठळक मुद्देजनजागृती अभियान : शहरातील बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी सांधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.प्लास्टिक वापराचे दुषपरिणाम, त्याचा पर्यावरण तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम, याबाबत लोकांमध्ये जागृती घडवून आणावी. जिल्ह्यातून प्लास्टिकचा वापर शक्य तेवढा कमी करुन पर्यावरणस्रेही वातावरण निर्मितीबाबत लोकांचा कल वाढावा, या उद्देशाने जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अब्दुल बारी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या जागृती अभियानात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून वर्धा शहराच्या विविध भागात जावून जागृतीचा प्रयत्न केला. प्लास्टिक समूळ निर्मूलन अशक्य आहे. अन्नपदार्थ तसेच इतर साहित्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असतो. मात्र ते नष्ट करता येत नसल्याने पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो.तसेच जाळण्याचा प्रयत्न केल्यास प्रदुषण वाढते. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या जागी कागदी अथवा कापडाच्या पिशव्यांचा वापर केल्यास पर्यावरण सुरक्षित राहील तसेच प्रदुषणास देखील आळा बसेल. याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी लिफाफे, पॉकेटस वर्धेतील शासकीय तसेच गैरशासकीय औषध वितरण केंद्रांत व अन्य दुकानदारांना वितरीत करुन त्यांना प्लास्टिक पिशव्यामध्ये वस्तू न देता कागदी पिशव्यांचाच वापर करावा, असा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात दुकानदारांनी सहभागी होऊन त्यांना प्रतिसाद देत सहकार्यही केले.विद्यार्थ्यांनी हाच संदेश नागरिकांनाही दिल्याने नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. वर्धेतील दुकानदारांसह सर्वसामान्य लोकांनी सुद्धा पर्यावरणपूरक कागदी अथवा कापडाच्या पिशव्या वापरण्याबाबत विश्वास व्यक्त केला. या जनजागृती अभियानाच्या आयोजनाकरिता रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलींद शेंडे, प्रा. अल्पना वनमाली, डॉ. एस.आर. जूनघरे, डॉ. मंगला तोमर, प्रा. मधुरिमा नायडू, प्रा. शैलेश जनबंधु यांच्यासह रजत शेंडे, प्रमोद पाटील, मानसी यादव, राधा यादव, अनिकेत क्षिरसागर, प्रवीण देबे, सुबोध वाघ आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी