शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतामानात केळी पीक जगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:14 IST

जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे.

ठळक मुद्देपारा ४४ अंशांवर : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. मात्र, सध्या वर्धा जिल्ह्याचा पारा ४४ अंशाच्यावर पोहोचल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली असून केळी पीक जगविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.पवनार येथील प्रगतशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी यावर्षी २० फेब्रुवारीला केळी पिकाची पाच एकरामध्ये लागवड केली. ७ हजार ५०० रोप त्यांनी लावली आहेत. सध्या वाढत्या उष्णतामानात केळी पीक जगविण्याचे मोठे आव्हान केळी उत्पादक शेतकºयांसमोर आहे. वाघमारे यांच्या शिवाय पवनार, सुरगाव या भागातही अनेक शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. सेलू तालुक्यात अनेक गावात केळीचे उत्पादन घेतले जाते. उकाड्यापासून केळीचा बचाव करण्यासाठी बोरूची लागवड केळीच्यामध्ये किंवा बाजूला केली जाते. अनेक शेतकरी केळी पिकाच्या रोपाजवळ पाणी व ओल टिकून राहावे म्हणून ठिबंक सिंचन यंत्रणेचा अवलंब करतात. तर काही शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी केळीच्या बगीचाचे वातावरण टिकून राहावे म्हणून प्रिक्लंरचाही वापर सुरु केला आहे, अशी माहिती कुंदन वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना दिली. वाढत्या उन्हामुळे केळी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरजखानदेशात मोठ्या प्रमाणावर तपत्या उन्हामुळे केळी पीक करपले असताना वर्धा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी केलेल्या नियोजनामुळे उन्हाळ्यातही केळी पीक काही प्रमाणात बऱ्यापैकी स्थितीत आहे. परंतु, सध्या पारा झपाट्याने वर चढत असल्याने शेतकºयांच्या अडचीत भर पडली आहे. त्यामुळे त्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.ग्रामीण भागात शेतीच्या फिडरवर आठ तासाचे भारनियमन दिले जात आहे. त्यामुळे केळी पिकाच्या ओलीतासाठी उर्वरित विद्युत असलेल्या काळातच पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे मोठी कसरत होत आहे. अशा परिस्थितीत केळी पीक जगविणे उत्पादकांना उष्णतामानात कठीण जात आहे.- कुंदन वाघमारे, केळी उत्पादक शेतकरी, पवनार.