शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:33 IST

देशातील सर्वोच्च सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिल्याने, अनेक विषय मार्गी लावता आले. जात, पात, धर्म, पंथ व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व सामान्यांचे कार्य करत राहणे व जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे हेच ध्येय आहे,.....

ठळक मुद्देरामदास तडस : प्रांतिक तैलीक समाजाच्या संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वोच्च सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिल्याने, अनेक विषय मार्गी लावता आले. जात, पात, धर्म, पंथ व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व सामान्यांचे कार्य करत राहणे व जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.वर्धा जिल्हा प्रांतिक तैलीक समाजाच्या संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर यांच्यावतीने संताजी सभागृहात विदर्भस्तरीय उपवर-वधू व पालक परिचय मेळावा खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रविण हिवरे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, नयना झाडे, माजी सभापती मिलींद भेंडे, चंद्रकांत महाकाळकर, संताजी सेवा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बुरले उपस्थित होते. पुढे बोलताना खा. तडस म्हणाले की, संत जगनाडे महाराजांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी करण्यास शासनाची मान्यता, राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा प्राप्त करुन देणे, तैलीक समाजाकरिता मुंबई येथे स्वतंत्र सभागृह बांधकामाकरिता भुखंड उपलब्ध करून देणे, क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना मदत करणे इत्यादी विषय मार्गी लावण्याकरिता प्रयत्न कायमच असतील. तसेच संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ व वर्धा जिल्हा प्रांतिक समाजाने नेहमीच आपल्या सामाजिक जाणिवेतून दरवर्षी उपवर मुलामुलींचा व पालकांचा परिचय मेळावा व माहीती पुस्तिका विमोचन सोहळा आयोजित करतात, या उपक्रमांत उपस्थित राहता आल्याचा आनंद होत आहे, असेही खा. तडस म्हणाले.यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, तैलीक महासभेचे जिल्हा अध्यक्ष अतुल वांदीले, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रविण हिवरे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बुरले यांनी आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच आतापर्यंतच्या उपक्रमांची माहिती दिली. उपस्थितांचे आभार सचिव सुनिल शिंदे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र झाडे, उपाध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष सचिन सुरकार, कोषाध्यक्ष सुधिर चाफले, सहसचिव जगन्नाथ लाकडे, सहसचिव नितीन साठोणे, संघटक विनायक तेलरांधे, संचालक पुष्पा डायगव्हाणे, संचालक सुरेंद्र खोंड, हरीष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, नामदेव गुजरकर, नरेंद्र भुरे, दिलीप चरडे, विनोद इटनकर यांच्यासह सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहाकार्य केले. या मेळाव्याला विदर्भातील प्रांतिक तैलीक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस