शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बँकेसमोर प्रहारचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

महाराष्ट्र बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाकरिता विम्याची अट घातली़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ ही अट रद्द करावी व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यात यावे, अशी मागणी

आर्वी : महाराष्ट्र बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाकरिता विम्याची अट घातली़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ ही अट रद्द करावी व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यात यावे, अशी मागणी प्रहारने केली़ यासाठी शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले़शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणासाठी महाराष्ट्र बँकेने विम्याची ५ हजार रुपयांची नाहक अट घातली होती़ विमा काढल्याशिवाय बँकेतून कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर मनस्ताप सहन करावा लागत होता. शहरातील अन्य राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विम्याची अट न घालता पीक कर्ज वितरित करण्यात येत असल्याने शेतकरी बँकेत विम्याबद्दलच्या चौकशीकरिता गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन धुडकावून लावले जात होते़ याबाबत माहिती शेतकऱ्यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांना दिली़ यावरून त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी बँकेवर मोर्चा नेला़ पीक कर्जाच्या मागणीसाठी बँकेच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले़ दोन्ही मागण्या मंजूर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका बाळा जगताप यांनी घेतली़ यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी बँकेचा निषेध नोंदवित नारेबाजी केली़ आंदोलन सुरू असताना शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.आर्वीचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. एक तासाच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या दोन्ही मागण्या मंजूर करण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढण्याकरिता आता विमा देण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढण्याकरिता होणारा त्रास व अटी रद्द झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला.(तालुका प्रतिनिधी)