शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांना साकडे

By admin | Updated: December 24, 2014 23:05 IST

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गाठून आपली समस्या मांडली.

वर्धा : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गाठून आपली समस्या मांडली. यावेळी झालेल्या चर्चेअंती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही ग्वाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी दिली.यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा नियोजित तारखेस करण्यात यावे. आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१४ पासून प्रलंबित असलेले वेतन अदा करण्यात यावे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात यावे. सर्व प्रा.आ. केंद्राचे वेतनाचे वित्तप्रषण त्वरित देण्यात यावे, तसेच दरमहा एक तारखेस वेतन व्हायला पाहिजे, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. संबंधित लिपिक, संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत वस्तुनिष्ट चर्चा करून आठ दिवसांत अहवाल देण्यात यावा, असे सांगितले असता सहायक प्रशासन अधिकाऱ्याने मुद्दा गुंतागुंतीचा असल्यामुळे वेळ लागेल, ही बाब लक्षात आणून दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी १५ दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश यंत्रणेला दिले. सन २०१३ पर्यंत १२ वर्ष कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला असून उर्वरित सर्व व २४ वर्ष आश्वासित प्रगती योजना लाभ देण्याकरिता गोपनीय अहवाल तपासणे सुरू आहे. त्वरीत लाभ देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी गुंडतवार, स.प्र.अ. चावरीपांडे, कोरान्ने, चावरे तर संघटनेच्यावतीने दिलीप उटाने, राज्यकार्याध्यक्ष, सिद्धार्थ तेलतुंबडे, सचिव रतन बेंडे, कार्याध्यक्ष सुजता कांबळे, नलिनी उबदेकर, प्रभाकर सुरतकर, विजय वांदिले, बाबाराव कनेर, दीपक कांबळे, शंकर हाते, अविनाश चव्हाण, विजय जांगडे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)