रामदास तडस : भाजपा कार्यकर्ता शिबिरपुलगाव : देशाच्या केंद्रस्थानी व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आहे. शासनाकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसाच्या व शेतकरी हिताच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या आहे; पण त्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला त्यांचा लाभ मिळणार नाही. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी संघटित कार्य करून स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया मजबूत करावा, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.वर्धा नदी काठावरील निसर्गरम्य श्री संकट मोचन हनुमान मंदिराच्या सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे तर अतिथी म्हणून नागपूर महानगर संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे, जिल्हा सचिव नितीन बडगे, शहराध्यक्ष मंगेश झाडे, सुरेश गणेशपुरे, महिला आघाडीच्या माधुरी इंगळे, दुर्गा व्यास, संजय गाते आदी उपस्थित होते.खा. तडस पूढे म्हणाले की, भाजपा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या विकासासाठी भाजपा शासन सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. कार्यान्वित असलेल्या योजनांचा लाभ जनतेला मिळवून द्या. आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांचे प्रयत्न आहे; पण ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती निर्माण होऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. पक्षामध्ये कार्यकर्त्यांनी चांगली फळी निर्माण झाली आहे. भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ जनतेला मिळावा महणून कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे बकाणे यांनी सांगितले.शिबिरातून विविध योजनांबाबत तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक झाडे यांनी केले. संचालन आकाश दुबे यांनी केले केले. प्रशिक्षण शिबिरात अरविंद भार्गव, अविनाश भोपे, संगीता देशमुख, गजेंद्र चंदेल, आशिष गांधी, अमिन ओलिया, साबीर कुरेशी, मधुकर रेवतकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
संघटितपणे कार्य करून स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया मजबूत करा
By admin | Updated: October 6, 2016 00:40 IST