शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाण पुलाकरिता रास्ता रोको

By admin | Updated: May 14, 2016 01:58 IST

येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नं. १४ वरील उड्डाण पुलाचे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी व नगर विकास सुधार समिती,

३० जण स्थानबद्ध व सुटका : आश्वासनावर आंदोलकांची माघारहिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नं. १४ वरील उड्डाण पुलाचे प्रलंबित बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी व नगर विकास सुधार समिती, हिंगणघाटच्यावतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निदर्शने करीत अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे दुतर्फा वाहनाच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी ३० जणांना स्थानबद्ध केले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली. नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे ३० कोटी १० लाख रुपयांच्या बांधकामाचे कंत्राट विजयवाडा येथील के.व्ही.आर. इंजि. कंपनीला २०१० रोजी देण्यात आले. या कंत्राटनुसार दोन वर्षात पुलाचे बांधकाम करणे बंधनकारक असताना काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु २०१६ मध्येही पुलाचे काम जैसे थे स्थितीत आहे.दिल्ली ते चेन्नई या वर्दळीच्या रेल्वे मार्गावरील हिंगणघाट रेल्वे स्टेशन लगतच्या गेट नं. १४ वरून रेल्वे प्रवासी व मालगाड्याचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यावर चार पाच गाड्याचे आवागमन झाल्यानंतर गेट उघडे होत असल्याने किंवा गेट बंद होण्याचे भीतीने वाहनांच्या धावपळीतून होणाऱ्या अपघाताची संख्या वाढीवर आहे. तसेच अरूंद रस्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसातून अनेकदा प्रभावित होते. या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे म्हणून अनेक विनंती अर्ज करण्यात आले. परंतु काम मात्र पूर्णत्वास आले नाही. काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासनहिंगणघाट : शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रा. दिवाकर गमे व मनोज रूपारेल यांच्यासह शेकडो युवकांनी निदर्शने करून काही वेळ महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. राष्ट्रीय महामार्गाचे टेक्नीकल मॅनेजर आशुतोष पिंपळे, के.एन.जे. प्रोजेक्टचे ब्रिज इंजिनिअर विजय बोधनकर यांनी आंदोलनस्थळी पोहोचून उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्ते मनोज रूपारेल व प्रा. गमे यांच्याशी चर्चा करून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचे आश्वासन दिले. मुदतीत काम पूर्ण न झाल्यास महामार्ग प्राधिकरणच्या नागपूर कार्यालयात धरणे आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात प्रमोद जुमडे, प्रफुल्ल क्षीरसागर, राजू अर्गुले, दिनेश रूपारेल, कमलाकर बोकडे, भाऊराव काटकर, अशोक जुनानी, आशिष शर्मा, अक्षय मुपीडवार, शेखर जामुनकर, अनिल खैरे, संदेश थुल, शशीकांत गिरी, ताराचंद भोयर, बल्लू गुप्ता, जगदीश शुक्ला, कवडू साळवे, विनोद कुंभारे, राकेश नगरवार, अखिल धाबर्डे, संजय बावणे, जितेंद्र रूपारेल, भारत ठाकूर, राजू जोशी, कहीमभाई, राजेंद्र पचोरी, ग्वाल आचार्य यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून सोडले.(तालुका प्रतिनिधी)