शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भीम टायगर सेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:47 IST

नवी दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुरूवारी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला महात्मा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देगांधी पुतळ्याजवळ : संविधान जाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवी दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुरूवारी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला महात्मा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.भीम टायगर सेनेच्यावतीने २२ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीकरिता साखळी उपोषण सुरु केले आहे. या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुंबई येथील नालासोपारा परिसरात सनातन संस्थेच्या व्यक्तीकडे १६ जिवंत बॉम्ब तर २० बॉम्बचे साहित्य आढळून आले. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. झोपडपट्टी वासियांना कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थ्यांना लाभ द्यावा. स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय योजना अर्धवट राबविण्यात आली. त्याची पूर्तता करण्यात यावी. रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना कागदपत्रांच्या जाचक अति रद्द कराव्या. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल दिवे, शहर अध्यक्ष विशाल रामटेके यांच्या नेतृत्वात नगरसेवक परवेज खान, धम्म शेलकर, प्रदीप कांबळे, पंकज लभाने, आशिष जांभुळकर, विनय खैरकार, आशिष दिघाडे , नितीन कुंभारे, सुरज बडगे, पंकज मुन, मंगेश मेश्राम, अनशु तेलंग, दीपक नेहरकर, बाबा जाकीर, अहमद पठाण, विकास झंझाळ, सोनू सहारे, प्रकाश कोरडे, राहुल पिंपळकर, अनिकेत गजभिये, स्वप्नील गोटे, अमित गजभिये, प्रतीक ठोबरे, पलेश कुलकर्णी, प्रशांत रामटेके, प्रणय कांबळे, विशाल पाटील, नरेश सावरकर, अमित गजभिये, राजू शेकोकार, अंकुश गजभिये, जगदीश जवादे, स्वप्नील रंगारी, बादल शेळके, प्रज्वल डंभारे, प्रदीप मेंढे यांच्या सह भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप