शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून दंड स्वरूपात होणारी लूट थांबवा

By admin | Updated: June 29, 2016 02:11 IST

महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना विलंबाने बिल देऊन ते मुदतीत अदा करण्याचा आग्रह केला जातो.

मनसेचा मुख्य अभियंत्याला घेराव : अन्यथा नागरिक वीज बिल भरण्यास नकार देणारहिंगणघाट : महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना विलंबाने बिल देऊन ते मुदतीत अदा करण्याचा आग्रह केला जातो. यात ग्राहकांना मुदतीत बिल न भरता आल्यास सरासरी २० रुपये दंड आकारला जाते. ही जनतेची लूट असून दंड आकारणे बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. यासाठी मुख्य अभियंत्यांना शुक्रवारी घेराव करून निवेदन देण्यात आले. घरगुती वीज ग्राहकांना विजेचे बिल दर महिन्याला मुदतीपर्यंत पोहोचविले जात नाही. बिल उशिरा मिळाल्याने मुदतीत देयकाचा भरणा करता येत नाही. यानंतर ग्राहकांवर सरासरी २० रुपये दंड आकारला जातो. यात ग्राहकांचा कसूर नसतो. वीज कंपनीच्या लेटलतिफ कारभारामुळे ग्राहकांकडून दर महिन्याला दंडाच्या स्वरूपात कोट्यवधीची रक्कम वसूल केली जाते. या मागे कंपनीचे षडयंत्र आहे. कंपनी ग्राहकांना वीज बिल उशिरा पोहोचविते. ही गरीब ग्राहकांची लूट आहे. ही लूट करण्यासाठीच वीज देयक उशिरा पोहोचविणे, मुदत कमी देणे, दंडाची रक्कम टक्केवारीने वाढविणे या बाबींची तरतूद कंपनीने केल्याचे दिसते. ही लूट थांबावी म्हणून ग्राहकांना त्यांचे वीज बिल किमान आठ दिवसांपूर्वी द्यावे, अन्यथा दंड आकारू नये. सदर बाबींची गंभीर दखल घेत कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून मनसेने केली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, उपाध्यक्ष अमोल बोरकर, राहुल सोरटे, सचिव सुनील भुते, मनविसे शहराध्यक्ष राजू सिन्हा, डॉ. अशोक रेवतकर, लक्ष्मण सावरकर, गोमासे, ज्ञानेश्वर महाजन, नितीन भुते, देवेश कुबडे, जगदीश मुडे, नरेश चिरकुटे, गजानन कलोडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)