शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा

By admin | Updated: September 12, 2016 00:39 IST

नागपूर - मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवे, जिल्ह्यातील सेलू, आर्वी, वर्धा आणि देवळी या तालुक्यातून जात आहे.

पत्रपरिषद : कायद्यातील बदलाचा निषेध वर्धा : नागपूर - मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवे, जिल्ह्यातील सेलू, आर्वी, वर्धा आणि देवळी या तालुक्यातून जात आहे. शासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून नेमका हा महामार्ग कुठल्या ठिकाणावरून जाणार आहे. स्मार्ट सिटी कुठे होणार त्याचे काहीही नियोजन नाही. शिवाय यात शेतकऱ्यांची सुपिक जमीन जाणार आहे. यात मोबदला देण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याकरिता वापरण्यात येत असलेल्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप महात्मा फुले समता परिषदेचे पूर्व विदर्भ विभागीय संघटक दिवाकर गमे यांनी पत्रकार परिषदेत केला. या रस्त्याकरिता शेतजमिनी घेताना कायदाच बाजूला सारून, मोबदला न देता, उद्योगपतीच्या घरात जमिनी घालण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. भूसंपादन कायातील तरतुदींना छेद देवून त्या विरोधी तरतुदीचा दुसरा कायदा, नोटीफिकेशन वा परिपत्रक शासनाला काढण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे गमे यावेळी म्हणाले. दुरूस्ती विरोधात उच्च न्यायालयात जाणार २२ आॅगस्ट २०१६ ला महाराष्ट्र हायवे अ‍ॅक्ट २०१६ अशी राज्य शासनाने जी दुरूस्ती केली त्यात कायद्याच्या परिक्षेत्राबाहेरील कलमे टाकली. ती प्रचलित कायदा भूसंपादन २०१३ याला छेद देणारी आहे. यामुळे ती रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्यावतीने गरज पडल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे गमे म्हणाले.