शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप बहुतांश शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच कर्जमाफी योजनेतील अडचणीही कायम आहेत. अशा अवस्थेत बँक व्यवस्थापकांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन पीक कर्जाकरिता होणारी फरफट थांबवावी, अशा सूचना वर्धेचे आ.डॉ. पंकज भोयर यांनी प्रशासनाला ...

ठळक मुद्देआमदारांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप बहुतांश शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच कर्जमाफी योजनेतील अडचणीही कायम आहेत. अशा अवस्थेत बँक व्यवस्थापकांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन पीक कर्जाकरिता होणारी फरफट थांबवावी, अशा सूचना वर्धेचे आ.डॉ. पंकज भोयर यांनी प्रशासनाला सोमवारी दिल्या.जिल्हाकचेरीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आ.डॉ. भोयर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, नगर रचनाकार सुनील देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, सहायक उपनिबंधक जयंत तलमले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी व उपअभियंता मंत्री यांची उपस्थिती होती.यावेळी शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, जयंत कावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भेंडे, अशोक कलोडे, नगर पालिका बांधकाम सभापती नौशाद शेख, माजी बांधकाम सभापती निलेश किटे यांनी विविध समस्या मांडल्या.सेलू तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे शेतकरी संतप्त झाला असल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. तेव्हाच जिल्हाधिकारी नवाल यांनी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कोहाड यांना कारवाईच्या सूचना केल्या. तसेच सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांवप्रमाणे नियमात राहून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. या बैठकीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही समस्यांचा पाढा वाचला.कंत्राटदाराला दिला तीन दिवसांचा अतिरिक्त वेळशहरातील दादाजी धुनिवाले चौक ते धंतोली चौकापर्यंतच्या सिमेंटीकरण व रूंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्याचा विचार करता ३० मे पर्यंत रस्त्याचे व नालीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी बांधकाम विभागाला दिल्या होत्या. या वेळात काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारावर रोजचा एक लाखांचा दंड ठोठावा, असेही सांगितले होते. कालावधी निघून गेला; पण काम पूर्णत्वास गेले नसल्याने दंड आकारण्याच्या सूचना या बैठकीत केल्या असता बांधकाम विभागाकडून तीन दिवसांचा अतिरिक्त कालावधी मागण्यात आला, त्यामुळे जिल्हाधिकारी नवाल यांनीच तीन दिवसात काम पूर्ण करा अन्यथा कंत्राटदारावर दंड आकार अशा सूचना केल्या.पांदण रस्त्याकरिता शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसादशेतकऱ्यांच्यापांदण रस्त्याची मोठी अडचण होत असल्याने अतिक्रमण मुक्त पांदण रस्ते ही योजना आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आली आहे. याकरिता शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत २०० किलो मीटर पर्यंतचे पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहे. मागणीनुसार मशीन कमी पडत असल्याने अजूनही १२० अर्ज प्रलंबित असल्याचे यावेळी आमदारांना सांगण्यात आले आहे.