शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरांगणा-आर्वी मार्गासाठी चोरीच्या वाळूचा होतोय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

पर्यावरण विभागाकडून परवानगी न मिळाल्याने जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव अद्यापही करण्यात आलेला नाही. अशातच काही वाळू तस्कर आपले एजन्ट नेमून चोरीची वाळू थेट बड्या कंत्राटदार कंपन्यांना चढ्या दराने विकत असल्याची माहिती आर्वीच्या महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांना मिळाली. याच प्राप्त माहितीनंतर महसूल विभागाच्या पथकाने उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या मार्गदर्शनात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली.

ठळक मुद्देवाळू भरलेली पाच टिप्पर जप्त : महसूलच्या कारवाईत उलगडले सत्य

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मोरांगणा) : खरांगणा-आर्वी मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या केले जात आहे. पण याच कामात चोरीच्या वाळूचा वापर होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर महसूल विभागाच्या चमून धडक कारवाई करून चोरीची वाळू घेवून जाणारे पाच टिप्पर व वाळू असा एकूण दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री उशीरा करण्यात आली.पर्यावरण विभागाकडून परवानगी न मिळाल्याने जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव अद्यापही करण्यात आलेला नाही. अशातच काही वाळू तस्कर आपले एजन्ट नेमून चोरीची वाळू थेट बड्या कंत्राटदार कंपन्यांना चढ्या दराने विकत असल्याची माहिती आर्वीच्या महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांना मिळाली. याच प्राप्त माहितीनंतर महसूल विभागाच्या पथकाने उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या मार्गदर्शनात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान पाच टिप्पर मध्ये चोरीची वाळू नेली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी ही वाहने थांबवून पाहणी केली असता या अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा भरणा असल्याचे आणि वाळूची वाहतूक करण्यासाठी कुठलीही परवानगी नसल्याचे पुढे आले. त्यानंतर ही पाचही वाळू भरलेली टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत वाळूसह तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही चोरीची वाळू खरांगणा-आर्वी मार्गाच्या सिमेंटीकरणात वापरण्यात येणार होती असे महसूल विभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. ही कारवाई आर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार कदम, मंडळ अधिकारी यांनी केली.

टॅग्स :sandवाळू