शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वक्तव्याचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:56 IST

नव्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह विधान केले.

ठळक मुद्देसमुद्रपुरात शिक्षकांचा मोर्चा : निषेधाचे निवेदन सादर

ऑनलाईन लोकमतसमुद्रपूर : नव्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह विधान केले. या विधानाचे पडसाद आता जिल्हाभर उमटत आहेत.या निषेधात शनिवारी समुद्रपूर येथील शिक्षकांनी मोर्चा काढून शिक्षणाधिकाऱ्याच्या निषेधाचे निवेदन पंचायत समितीत सादर केले.यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत असून शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शिक्षकांनी उत्तम कामगिरी बजावली. या कामगिरीअंतर्गतच २०१८-१९ या नव्या शैक्षणिक सत्राकरिता काही उपक्रम राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या उपक्रमाची माहिती देण्याकरिता शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसह केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांना आज कोणीच विचारत नाही. यासह अनेक आक्षेपार्ह विधान केले. या विधानाचे पडसाद जिल्हाभर उमटत असून समुद्रपूर येथील प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे गावंडे यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीवर शिक्षकांचा मोर्चा नेण्यात आला. यावेळी गटविस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना निषेध नोंदविण्यासंदर्भात निवेदन सादर केले. तसेच शनिवारी तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी या निषेधात काळ्या फिती लावून काम केल्याचे दिसून आले.शिक्षकांनी मोर्चे टाळावेशिक्षणाधिकारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे शिक्षकांत चांगलीच नाराजी व्यक्त झाली असून संतापाची लाट आहे. या संतापामुळे शिक्षक या नव्या शिक्षणाधिकाºयांविरोधात मोर्चे काढण्याच्या तयारीत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांवर मोर्चे टाळण्याचा दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहे. मोर्चे टाळण्याकरिता शिक्षणाधिकाºयांनी शिक्षकांची माफी मागावी अशी भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली असून सदर प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे.