शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्याची कार्यशाळेत आत्महत्या

By admin | Updated: July 15, 2017 02:15 IST

येथील राज्य परिवहन महामंडळाच्या सेवाग्राम स्थित कार्यशाळेत कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या

रात्रभर कार्यशाळेत मुक्काम : सकाळी आढळला मृतदेह लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या सेवाग्राम स्थित कार्यशाळेत कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रोजच्या अपमानजनक वागणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. प्रभाकर पडोळे असे मृतकाचे नाव आहे. प्रभाकरने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने कोणत्या बँकेत किती रक्कम गोळा करून ठेवली याची माहिती लिहून ठेवली आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. चिठ्ठीत रोजच्या अपमानजनक वागणुकीमुळे आत्महत्या केल्याचे समोर आल्याने या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी तपास सुरू केला आहे. होणारा अपमान कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होता की इतर कुणाकडून याचा खुलासा तपासाअंती होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या सेवाग्राम येथील कार्यशाळेत प्रभाकर पडोळे कुशन विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी ते आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या चोरून कार्यशाळेतच थांबले. याची कुणाला कल्पनाही आली नाही. आज सकाळी सर्व कर्मचारी नित्याप्रमाणे कामावर गेले असता येथे पडोळेचा मृतदेह अटकून असल्याचे दिसून आले. याची माहिती विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे. यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न च्पडोळे गत काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. त्याचे औषधही घेत होते. पडोळे यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. घटनेनंतर कार्यशाळेत चर्चा करताना कर्मचारी.