शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तुरीसाठी राज्य विभागले चार रंगात; नागपूर विभागाला ‘आॅरेंज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 11:43 IST

राज्य शासनाने घेतलेला तूर खरेदीचा निर्णय यंदा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. कधी ग्रेडरची कमतरता तर कधी उत्पन्नाची मर्यादा. आता तर खरेदी झालेल्या तुरीचे पोते शिवण्याकरिता महाराष्ट्र चार रंगात विभागण्यात आला आहे.

ठळक मुद्देखरेदी यंत्रणेची रंगीत सुतळीकरिता धावपळ

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने घेतलेला तूर खरेदीचा निर्णय यंदा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. कधी ग्रेडरची कमतरता तर कधी उत्पन्नाची मर्यादा. आता तर खरेदी झालेल्या तुरीचे पोते शिवण्याकरिता महाराष्ट्र चार रंगात विभागण्यात आला आहे.खरेदीनंतर पोते शिवताना प्रत्येक विभागाला वेगवेगळा रंग देण्यात आल्याने त्या रंगाची सुतळी आणण्याकरिता खरेदी यंत्रणेची तारांबळ उडत आहे.आतापर्यंत मिळेल त्या सुतळीने दाभणाच्या सहाय्याने पोते शिवल्या जात होते. आता मात्र चार विभागांना वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत. तसेच आता मशीनच्या मदतीने पोते शिवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे तूर खरेदी केंद्रावर या रंगाच्या सुतळीकरिता पळापळ निर्माण झाली आहे.पहिले तर रंगाची सुतळी मिळत नाही आणि मिळाली तर ती सुतळी लागणारी मशीन कुठून आणावी? तूर खरेदी करताना केवळ सूतच नाही त्याला लेबलही लावावयाचे आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

महाराष्ट्राला मिळालेले रंगविदर्भाला आॅरेंज, उत्तर महाराष्ट्र हिरवा, मराठवाडा लाल आणि पश्चिम महाराष्ट्राला पांढऱ्या रंगाची सुतळी वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

रंगीत सुतळीच्या अडचणीने काटे रखडलेकृषिमंत्र्यांनी काढलेल्या या फतव्यामुळे खरेदी यंत्रणा त्या रंगाची सुतळी आणि शिलाई मशीनच्या शोधात आहे. यामुळे अनेक ठिकाणी काटे रखडले आहेत.

कमिशनमधून मशीन आणि सुतळी खरेदीसुतळी आणि लेबल शासन देणार नाही तर ते खरेदी यंत्रणेला मिळणाऱ्या कमिशनमधून खरेदी करावयाचे आहे. दिलेल्या रंगाची सुतळी किंवा सूत खरेदी करताना चांगलीच दमछाक होत आहे. केवळ सूत आणून भागणार नाही तर पोते शिवण्याकरिता मशीनही उपलब्ध करून द्यावयाची आहे.

शासनाने तुरीचे पोते शिवण्याकरिता रंगीत धागे वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. या धाग्यांची व्यवस्था खरेदी विक्री संघाला करावयाची आहे. नागपूर विभागाला आॅरेंज रंगाचा धागा वापरण्याच्या सूचना आहेत.- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र