शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला राज्यस्तरीय ‘नॅक्स’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:59 IST

नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला.

ठळक मुद्देसाहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक सेवा पुरविण्याकरिता हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ही आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील साहूर प्राथमिक आरोग्य केंद्र अग्रेसर असल्याने पुरस्काराकरिता केंद्राची निवड झाली आहे. येथे देण्यात येत असलेली सुविधा, प्रयोगशाळा नागरिकांकरिता महत्त्वाची ठरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी पुणे येथे आयोजित एका बैठकीत स्वीकारला.साहुर प्राथमिक केंद्राप्रमाणे जिल्ह्यातील इतर आठ प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्यात येणार आहे. याकरिता खरांगणा, मांडगाव, अल्लीपूर, विजयगोपाल, कन्नमवारग्राम, सिंदी (रेल्वे) आणि हमदापूर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे. हे केंद्रही अद्यावत करण्यात येणार आहे. सध्या साहुर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.पुरस्कार वितरण सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य विभागाच्या विविध अभियाचे संचालक तथा आयुक्त डॉ. संजीव कुमार, आरोग्य संचालक सतीश पवार, उपसंचालक संजय जयस्वाल यांची उपस्थिती होती.सीआरएमकडून होणार पाहणीआरोग्य यंत्रणा विविध पुरस्कार प्राप्त करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्याकरिता देशपातळीवरील सीआरएम चमू दाखल होणार आहे. ही चमू नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. ही चमू येण्यापूर्वी आरोग्य सेवा पुरविण्यात अग्रेसर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.जिल्हावासियांना यथायोग्य आरोग्य सेवा पुरविण्याकरिता आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. मिळालेला पुरस्कार हे याचेच गमक आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि विशेष करून मुख्य कार्यपालन अधिकाºयांचे याकरिता विशेष सहकार्य मिळत आहे.- डॉ. अजय डावले, जिल्हा आरोग्य अधिकारी.