शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

तोट्यामुळे राज्य सहकारी बँकेची ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:26 IST

वर्धा जिल्हा सहकारी बँकेचा प्रचंड तोटा असल्याने हा भार झेपविणे सध्या कठीण असल्याचे सांगत राज्य सहकारी बँकेने तुर्तास विलिनीकरणास नकार दिला़ बुधवारी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात वर्धा जिल्हा सहकारी बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरणा संदर्भात बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देमुंबईत बैठक : जिल्हा सहकारी बँकेच्या विलिनीकरणाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्हा सहकारी बँकेचा प्रचंड तोटा असल्याने हा भार झेपविणे सध्या कठीण असल्याचे सांगत राज्य सहकारी बँकेने तुर्तास विलिनीकरणास नकार दिला़ बुधवारी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात वर्धा जिल्हा सहकारी बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरणा संदर्भात बैठक घेण्यात आली.सदर बैठकीला सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, आ़ डॉ़ पंकज भोयर, आ.अनिल सोले, आ.समीर कुणावार, आ.डॉ. रामदास आंबटकर, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा निबंधक वालदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २ लाख १७ हजार ५३८ ठेवीदार आहे. त्यांची बँकेकडे ३५५.४४ कोटी रुपयांची ठेवी आहे़ मात्र, ही रक्कम बँकेकडून मिळत नसल्याने खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ तसेच आपल्या कष्टवर्जीत पैशाचे नेमके काय होईल याची भीती खातेदारांना आहे़ खातेदारांचे पैसे परत मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य बँकेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक विलीन करावी अशी मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी केली होती़ सदर गंभीर प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात त्यांनी मांडला़ पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळीही हा प्रश्न उपस्थित केला होता़ या संदर्भात सतत पाठपुरावा केल्याने अखेर मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकी दरम्यान जिल्हा सहकारी बँकेच्या स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली़ राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, वर्धा जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे? बँक कोट्यावधीच्या तोट्यात असल्याने हा तोटा सहन करणे राज्य सहकारी बँकेलाही कठीण आहे़ बँकेत सद्या १५४ कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या वेतनापोटी दरवर्षी १२ कोटी रुपयांचा भार बँकेला सहन करावा लागत आहे.़ ३१ आॅगस्ट २०१८ च्या स्थितीप्रमाणे बँकेला आणखी १०१.३१ कोटींची गरज आहे़ वास्तविक बँकेने ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास पूर्णत: गमाविल्याने बँक पुन्हा सुरू होणे अशक्य असल्याचा अभिप्रायही राज्य सहकारी बँकेने नोंदविला़ विलीनीकरणामुळे राज्य सहकारी बँकेला मोठे नुकसान होणार. ते भरुन काढण्यासाठी अतिरिक्त १५० कोटींचा अर्थसहाय्य आवश्यक आहे़ तसे झाल्यास विलीनीकरणाची प्रक्रिया पार पाडता येईल, असेही राज्य सहकारी बँकेने स्पष्ट केले़ सप्टेंबर २०१२ पर्यंत बँकेचे व्यवहार सुरळीत होते. ३१ मार्च २०१२ ला बँकेचा सीआरएआर वजा १८.४० झाल्याने रिझर्व बॅकेने ९ मे २०१२ ला निर्बंध घातले़ सी.आर.ए.आर. सद्यस्थितीत कायम राखण्यासाठी केंद्र व राज्य शासन व नाबार्डकडून १६१.२१ कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले़. त्यामुळे रिझर्व बँकेने परवाना बहाल केला़ सद्यास्थितीत वर्धा जिल्हा बँकेच्या रिलायबल असेटस पेक्षा जबाबदाºया २०६.४२ कोटींने जास्त आहे़ अशा स्थितीत हा बोझा राज्य सहकारी बँकेवर पडणार आहे़ जिल्हा बँकेचे ढोबळ एलपीएचे प्रमाण ९८ टक्के आहे़ त्यामुळे तुर्तास बँकेच्या विलीनीकरणासंदर्भात निर्णय घेणे शक्य नाही, असे या बैठकीत राज्य सहकारी बँकेच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने अतिरिक्त अर्थसहाय्य केल्यास यावर विचार करण्यात येईल, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.जिल्हा सहकारी बँकेत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार आदी खातेदारांची रक्कम सुरक्षित राहावी व त्यांना ती रक्कम परत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाची करण्याची विनंती केली.त्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती.- डॉ. पंकज भोयरआमदार, वर्धा.राज्य सहकारी बँकेने वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील जबाबदाºया व तोटा फार असल्याने तसेच एन.पी.ए.च्या मुद्यावर विलीनीकरणाबाबत नकार दिला आहे. मात्र, जनतेचे पैसे सुरक्षित परत मिळावे यासाठी आम्ही विलिनीकरणाचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.- समीर कुणावारआमदार, हिंगणघाट.

टॅग्स :bankबँक