शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

डिझाईन मंजुरीविना कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:32 IST

काँगे्रस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘गांधी फॉर टुमारो’ भाजप सरकार ‘सेवाग्राम विकास आराखडा’ नावाने राबवित आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम विकास आराखडा : कंत्राटदार कंपनीचा प्रताप; शासकीय निधीची धुळधाण

प्रशांत हेलोंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँगे्रस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘गांधी फॉर टुमारो’ भाजप सरकार ‘सेवाग्राम विकास आराखडा’ नावाने राबवित आहे. यातील कामांना मंजुरी दिली असून जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबईला कंत्राटही दिले; पण अद्याप कुठलेही डिझाईन मंजूर झाले नाही. असे असले तरी कंत्राटदार कंपनीला कामे उरकण्याची लगीनघाई झाली आहे. डिझाईन मंजूर होण्यापूर्वीच कामांना प्रारंभ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.केंद्र व राज्य शासनाकडून गांधी फॉर टुमारो महात्मा गांधी प्रशिक्षण व अनुसंधान केंद्राच्या पहिल्या टप्प्यासाठी १४४.९९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यात सेवाग्राम, पवनार, वर्धा ते सेवाग्राम रोड तथा अन्य ठिकाणच्या कामांचा समावेश आहे. यातील कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली. यातील डिझाईन फायनल करण्यासह अन्य तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी २९ आॅगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले तरी कंत्राटदार कंपनीला कामांची घाई झाल्याचे दिसून येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत अद्याप कुठल्याही कामांचे डिझाईन फायनल झालेले नाही. असे असताना कंत्राटदार कंपनीने वर्धा ते सेवाग्राम मार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला काम सुरू केले आहे. या सभागृहाचे बांधकाम करणे, पार्किंगची सुविधा निर्माण करणे, कुंपण भिंत बांधणे, भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे यासह अन्य कामांचा समावेश आहे. या कामांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आला आहे; पण यातील कामांचे डिझाईन मंजूर झालेले नाही. यातील कोणत्या कामात कोणत्या ग्रेडचे साहित्य वापरणार याबाबतचे ‘मीग डिझाईन’ मंजूर झाले नाही. असे असताना कंत्राटदार कंपनीने काम सुरू केले आहे. यातून शासनाच्या निधीची धुळधान केली जात असल्याचेच दिसून येत आहे.महत्त्वाकांक्षी असलेल्या गांधी फॉर टुमारो या प्रकल्पांतर्गतच मंजुरी न घेता कामे सुरू केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ही कामे कंत्राटदाराकडून करून घेतली जात आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.मिग डिझाईनला मंजुरीच नाहीसेवाग्राम मार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले जात आहे. या टाकीचे डिझाईन अद्याप फायनल झाले नाही. यातील भूमिगत पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे बांधकामावर होणारा खर्च अनाठायी ठरणार नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय हे काम करीत असताना कोणत्या गे्रडचे साहित्य वापरणार, याची माहितीही संबंधित विभागाला देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. मग, बांधकामाची परवानगी दिली कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सेवाग्राम मार्गावर पेट्रोल पंपाच्या बाजूला सभागृह, कुंपण भिंत, भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले जात आहे. यातील काही डिझाईनला मंजुरी मिळाली आहे. तेच काम सुरू आहे.- अनंता पटेल, अभियंता, जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी, मुंबई.