शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू

By admin | Updated: February 16, 2015 01:38 IST

परिसरात कांदापिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते़ सध्या कांदा कापणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवडीची लगबग दिसून येत आहे़

तळेगाव (श्या़पं़) : परिसरात कांदापिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते़ सध्या कांदा कापणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवडीची लगबग दिसून येत आहे़ कांदा पिकांसाठी प्रथम बियाण्यांपासून रोपे तयार करावी लागतात़ एक एकर कांदा लागवडीकरिता किमान ८ ते १० किलो कांद्याचे बी लागते़ या बियाण्याची आजची किंमत २००० रूपये प्रतिकिलोने वीस हजार रूपये होते़ बियाण्यापासून रोपे तयार होईस्तोवर खते, कीटकनाशक, फवारे व मशागतींचा खर्च २५ हजार रूपयांपर्यंत येतो. नंतर रोपाची पुन्हा लागवड केली जाते़ रोपांच्या लागवडीपासून कांदा पीक घरी येईपर्यंतचा खर्च ४० हजार रूपयांपर्यंत येतो़ म्हणजेच एक एकर कांदा लागवडीला पूर्ण ५० हजार रूपये खर्च येतो़ कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली नाही तर एका एकारामध्ये चांगल्यापैकी १५० क्विंटल कांदा उत्पादन होऊ शकतो़ अवकाळी पावसामुळे पिके जमिनदोस्त होतात तर कधी दव रोगामुळे पिके करपून हातात. कधी मध्येच ओलिताकरिता पाणी कमी पडल्याने पिके जळतात़ यामधून जर पिके वाचलित आणि चांगले भरपूर उत्पादन झाले तर पिकाला योग्य भाव मिळतो़ कधी कधी १०० ते १५० रूपये क्विंटल या अत्यल्प दराने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो़ परंतु नुकसानीचा धोका पत्करून तलेगाव परिसरातील शेतकरी कांदा व्यवसाय करीत आहेत. कांदा पिकाच्या भरवशयावरच शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या मशागती होतात. रब्बी हंगामात पेरण्यात येणारे कांद्याचे पीक हे उन्हाळ्याच्या दिवसात निघत असल्याने पावसाळ्यातील खरीप खरीप हंगाम याच पिकाच्या भरवश्यावर अवलंबून असतो़ या काही काळात तळेगाव(श्या.प.) या परिसरात कांदा उत्पादकांची संख्या वाढली आहे. कापूस व सोयाबीनला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)