शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी आरक्षण’ अभियानाला प्रारंभ

By admin | Updated: April 26, 2017 00:28 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी

शैलेश अग्रवाल : कर्ज-वीज बिल माफी, रास्त हमीभावाची मागणी वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून मागास जाती-जमातींना जसे आरक्षण लागू केले, तसे शेतकरी कुटुंबाना शैक्षणिक, नोकरी व पदोन्नतीत आरक्षण लागू करावे या मागण्यांकरिता सेवाग्राम आश्रमातून ‘एकच मिशन, शेतकरी आरक्षण’ अभियान सुरू केल्याची माहिती गोतीर्थ प्रकल्पाचे संचालक व प्रगतशील शेतकरी शैलेश अग्रवाल यांनी दिली. विश्रामगृहात सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेला माजी पं.स. उपसभापती संदेश किटे, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अनिल उमाटे, दीवाकर श्रावणकर आदी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणासारखा उपाय राज्यघटनेंतर्गत लागू केल्याने सामाजिक विषमता बव्हंशी कमी झाली आहे. याच न्यायाने शेतकऱ्यांना आरक्षण लागू झाल्यास शिक्षण, नोकरी व पदोन्नतीत संधी मिळेल. महागडे उच्चशिक्षण पैशाअभावी घेऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांची मुले, भावंडे मागे राहतात. शेतमालाचे हमीभाव ठरविण्याची पद्धत चुकीची आहे. यामुळे आर्थिक विवंचनेच्या गर्तेत सापडून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांची गुणवंत मुले पैशाअभावी अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्चशिक्षण घेऊ शकत नाही. आरक्षण मिळाल्यास शिकता येईल, नोकरी व पदोन्नतीद्वारे शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार होईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. एकदा सर्व शेतकऱ्यांना बँका, खासगी सावकार आणि वीज बिलापासून मुक्त करावे. नव्याने जीवन जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी अग्रवाल यांनी केली. शेतकऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील. मार्ग निश्चित नसून राज्यात जिथे शेतकरी बोलवतील, तिथे आपण जाऊ, असेही त्यांनी नमूद केले.(कार्यालय प्रतिनिधी)