शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘स्टार्स’ तंत्रप्रणालीने अवघड जखमेवरही त्वचारोपण

By admin | Updated: June 20, 2015 02:33 IST

एकदा झालेली जखम लवकर भरुन निघेल याची शाश्वती कमीच. महागड्या उपचाराने ती भरुन काढण्याचे तंत्रज्ञानही विकसीत आहे.

श्रीवास्तव यांचे अभिनव संशोधन : सावंगी रुग्णालयात २४ रुग्णांवर यशस्वी उपचारवर्धा : एकदा झालेली जखम लवकर भरुन निघेल याची शाश्वती कमीच. महागड्या उपचाराने ती भरुन काढण्याचे तंत्रज्ञानही विकसीत आहे. मात्र यावर एक पाऊल पुढे टाकत दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता केवळ इंजेक्शनच्या आधारावर अल्पावधीत ती जखम भरुन काढणारी नवी तंत्रप्रणाली शोधून काढली आहे.या तंत्रज्ञानाला ‘स्टार्स’(संदीपस् टेक्निक फॉर असिस्टेड रिजनरेशन) असे नाव देण्यात आले आहे. रुग्णांच्या अवघड जखमांमध्ये नव्या त्वचारोपणाकरिता या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वैद्यकशास्त्राच्या इतिहासात कदाचित हा पहिलाच नवनिर्मित प्रयोग असावा. आॅस्टिओआथ्रायटिस, नाजुक अस्थिभंग, अस्थिकांडावरील जखमा, आकस्मिक दुखापतीवरील त्वचा पुर्ववत करण्याकरिता प्रथमच ही पद्धत विकसित करण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीवास्तव यांनी दिली. कुलपती दत्ता मेघे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरु डॉ. दिलीप गोडे यांचे प्रोत्साहन महत्वाचे ठरले, अशी माहितीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. रुग्णालयाद्वारे आदिवासी परिवारांसाठी शालिनी माता, कुमार व बाल आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेचा प्रारंभ येत्या सोमवारपासून सेलू तालुक्यातील टाकळी(झडशी) येथून करण्यात येणार आहे. सालई कला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ गावे, झडशी केंद्रांतर्गत २० गावे, खरांगणा केंद्रातील १४ तर कान्होली आरोग्य केंद्रातील २४ गावांतील आदिवासी परिवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गर्भवती माता, बाळंत माता, नवजात शिशूंची आरोग्य तपासणी व किशोरवयीन मुलांमुलींचे समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती आयुर्विज्ञान संस्थेचे कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली. तसेच मेघे रुग्णालय व रोटरी क्लबतर्फे स्तनांच्या कर्करोग तपासणीसाठी फिरती मॅमोग्राफी मोफत सेवा सुरु करणार असल्याचेही मेघे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)औषधोपचार बाद, इंजेक्शनद्वारे उपचारही उपचाराची पद्धत अगदी साधी आणि सोपी असून रुग्णावर औषधपचाराचीही गरज नाही. रुग्णाच्याच रक्ताचा नमुना घेऊन त्यातील रक्तपेशीच्या आधारे उपचार केले जातात. या तंत्रज्ञानामुळे उपचारबाह्य व्रण, पोषणाअभावी निर्माण झालेले अल्सर, बेडसोर्स, त्वचेपर्यंत जखम पसरलेले अस्थिभंग, पेशीजालांच्या मोठ्या दुखापती आदींवर उपचार करणे सहज शक्य झाले असून २४ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.या उपचारासाठी रुग्णाला महागडी औषधे अथवा अवघड शस्त्रक्रियांची गरज भासत नाही. तसेच कोणतेही विपरित परिणाम जाणवणार नाही, असेही डॉ. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.