शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शिवपांदणीवर तारेचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:56 IST

परिसरातील शेतासाठी सामूहिक रस्ता असलेल्या शिवपांदणीच्या मधोमध तारांचे कुंपण घालून रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने हे बांधकाम केले जात आहे.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणाचा प्रताप : वाटखेडा चौफुलीवरील कास्तकारांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : परिसरातील शेतासाठी सामूहिक रस्ता असलेल्या शिवपांदणीच्या मधोमध तारांचे कुंपण घालून रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने हे बांधकाम केले जात आहे. महसूल कार्यालयाच्या नोंदीनुसार हा रस्ता एकपाळ्याकडे जाणारी शिवपांदण असताना रस्ता अडविल्याचा उपद्रव्याप केला जात असल्याचे शेतकरी सांगतात.स्थानिक न.प.च्या पाणी पुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने अंदोरी ते देवळी या दरम्यान नव्याने पाईप लाईन टाकून योजनेचे काम पूर्णत्वास नेले जात आहे. यासाठी वॉटर प्रेशरसाठी वाटखेडा चौफुलीवर नव्याने पाण्याचे टाकी बांधण्यात आली आहे. याचे सभोवताल ताराचे कुंपण केले जात आहे;पण हे कुंपण एकपाळाकडे जाणाऱ्या ७० फुट रूंदीच्या शिवपांदणीवर करण्यात येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा बैलबंडीचा रस्ता बंद झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता कास्तकारांना उडवा-उडवीचे उत्तर दिले जात आहे. स्थानिक न.प.चा व वाटखेडा चौफुलीवरील शिवपांदण रस्त्याचा काही एक संबंध नसताना आम्ही न.प. मालकीचे जागेत कुंपण घालीत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. आधीच या शिवपांदणीवर ३५ वर्षाचे आधी पाणी पुरवठ्याच्या टाकीचे बांधकाम करून रस्त्याचा काही भाग व्यापला आहे. आता पुन्हा पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनेसाठी शेतपांदणीचे बाजुला दुसऱ्या टाकीचे बांधकाम करून दोन्ही टाकीचे सभोवताल तारेचे कुंपण केले जात आहे. यामुळे शेतशिवाराचा पूर्ण रस्ता बंद झाला आहे. शेतातील कापूस व इतर शेतमाल कसा आणावा असा प्रश्न सध्या शेतकऱ्याना भेडसावत आहे. वॉटर प्रेशरसाठी नव्याने टाकीचे बांधकाम करण्यात आल्यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेली जुनी टाकी पाडण्यात आली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भूमिका न्यायसंगत नसल्यामुळे तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी संबंधितांना समज द्यावा, अशी मागणी शेतकरी संतोष मरघाडे, सुरेश वैद्य, मारोती मरघाडे, रामाजी काटेखाये, नरेंद्र तिगावकर, राजू देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.शेताकडे जाणारा रस्ताच झाला बंदआधीच या शिवपांदणीवर ३५ वर्षाचे आधी पाणी पुरवठ्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचा काही भाग यात व्यापल्याने पूर्वीच शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता पुन्हा पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनेसाठी पांदणीचे बाजुला दुसऱ्या टाकीचे बांधकाम करून दोन्ही टाकीचे सभोवताल तारेचे कुंपण केले जात आहे. यामुळे शेतशिवाराचा पूर्ण रस्ता बंद झाला आहे. शेतात कसे जावे हा प्रश्न या भागातील शेतकºयांना भेडसावत असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी आहे.