शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी केला आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:31 IST

राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

ठळक मुद्देतीन दिवसीय संप : मुख्य मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सदर आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या तात्काळ निकाली काढा अन्यथा बेमुदत संप असा इशाराच सरकारला देत आपला आवाज बुलंद केला.राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या पूर्णत्त्वास जाव्या यासाठी यापूर्वी संबंधितांना निवेदने देत अनेक आंदोलन करण्यात आली. परंतु, मागण्यांवर विचार न झाल्याने ७,८ व ९ आॅगस्ट या कालावधीत संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार करण्यात यावी. जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्याची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासून वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रक्कमेसह मंजूर करावा. अशंदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची परिभाषिक पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावे. सर्व नोंदणीपटावर असलेल्या अर्जधारकांना एकवेळची बाब म्हणून अनुकंप तत्त्वावर नियुक्त्या देण्यात याव्या. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे. शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करण्यात यावे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १०० टक्के समायोजन करावे. निवृत्तीचे वय ६० वर्षे व ५ दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्त्व हरिषचंद्र लोखंडे, नितीन तराळे, बी.व्ही. भोयर, विनोद भालतडक यांनी केले. आंदोलनात जयप्रकाश थोटे, पांडुरंग भालशंकर, राजू चंदनखेडे, महेंद्र सालंकार, धर्मपाल मानकर, संजय पाटील, मंदा चौधरी, प्रविण देशमुख, शशांक हुलके, प्रमोद खोडे, प्रविण भोयर, अजय वानखेडे यांच्यासह सुमारे २० विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून नोंदविला निषेधया संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाले आहे. परंतु, नागरिकांना आरोग्य सेवा घेताना कुठलाही त्रास होऊ नये या हेतूने जिल्ह्यातील २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून काळ्या फिती लावून सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हा उद्देशच यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देताना आज जोपासला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप