शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

रखडलेल्या विहिरी मार्गी लागणार

By admin | Updated: June 18, 2014 00:20 IST

महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या जवाहर विहिरी व धडक सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वीच्या तालुक्यातील ६६ विहिरींच्या अपूर्ण बांधकामाला वाढीव

हिंगणघाट : महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या जवाहर विहिरी व धडक सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वीच्या तालुक्यातील ६६ विहिरींच्या अपूर्ण बांधकामाला वाढीव निधी देवून कामे पूर्णत्वास येणार असल्याची माहिती माजी आमदार राजू तिमांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.हिंगणघाट तालुक्यात सन २००७-०८ आणि ०८-०९ या दोन वर्षात एक हजार लाभार्थ्यांची जवाहर व धडक सिंचन विहिरींसाठी निवड झाली होती. यावेळी या विहिरींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात येत असताना जवळपास ९०० विहिरीचे बांधकाम पूर्णत्वास आले. परंतु ६६ विहिरीचे बांधकामाला अंशत: अनुदान देण्यात आल्याने त्या विहिरींचे काम पूर्ण झाले नाही. या विहिरीचे बांधकाम पूर्णत्वास आणण्यासाठी शासनाच्य १६ एप्रिल २०१४ च्या परिपत्रकानुसार मान्यता देण्यात आली आहे. आता ही जवाहर विहीर व धडक सिंचन विहीर योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांनी ज्या ज्या अभियंत्याकडून विहिरीच्या कामाचे मोजमाप केले त्यांच्याकडून तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहे. तर जवाहर विहिरीची सुधारित प्रशासकीय मान्यता गटविकास अधिकारी व धडक सिंचन विहीरीची प्रशासकीय मान्यता तहसीलदारांकडून लाभार्थ्यांना घ्यावी लागणार आहे. आता या योजनेंतर्गत विहिरीच्या बांधकामाचे अडीच लाखांपर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची तिमांडे यांनी सांगितले. या अपूर्ण विहिरी असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत कांता साळवे, सुबा कांबळे, शंकर दांडेकर(लहान आर्वी), दिगांबर बुराडे, अन्नपूर्णा वाकडे धानोरा, रामचंद शिंदे, बापूराव महाजन, जगदीश दिवे वडनेर, गणपत शिंदे, मंजुळा मडावी सेलू(खे.), महादेव कोडापे, योगेश्वर देवळकर, विश्वनाथ सराटे ढिवरी(पिं.), रुखमाबाई पारधी गंगापूर, संतोष चांदोरे भिवापूर, विनोद बुरबुरे, राजेंद्र अवचट, महादेव कासार काचनगाव, बेबी लोहकरे फुकटा, रामकृष्ण चरडे पिपरी, जगन नगराळे, शंकर नौकरकार, वामन हिवसे, येरणगाव, शिवराम सातकर आजनसरा, खुशाल शिवणकर, चिंचोली कापसी, पावर्ताबाई मेश्राम, काजी अल्ला कदीरउद्दीन, पुंडलिक तळवेकर, शामराव डहाळकर गांगापूर कापसी, दीपक कोवे, काशीनाथ वामद कोसुर्ला, रायभान कांबळे, नारायण निशानकर, शंकर शेडमाके बाबापूर, रामचंद्र मोहोड कुटकी, त्र्यबंक भुजाडे कुटकर, हुमानंद पाटील सावली, शिवराम मेश्राम बालधुर, पुष्पा सिडाम नांदगाव(का.), मारोती झिलपीले मोझरी, गंगाराम पंधरे येरला, प्रभाकर टापरे डोरला, शंकर टेकाम बोपापूर, वेणूबाई वाघमारे इंझाळा, हरीदास कांबळे, सुनंदा सारवरकर अल्लीपूर, संजय बुटले मुरपाड, विष्णू डोंगरे चिकमोह, खुशाल भोयर चिचघाट, केशव कोहळे सावंगी (हेटी), विजय खुरसंगे गाडेगाव, रामदास नगराळे, वाघोळी,पंजाब गव्हाळकर टेंभा, वामन खोंड दोंदुडा, जनाबाई मेश्राम घाटसावली, गणेश एकोणकर, परमेश्वर खुरपाडे शेगाव(कुंड) नथ्थु लांडगे सातेपुळ, जयराम फुळकर, प्रभाकर हरणे कडाजना, भिमाबाई ठाकरे, सतीका पानतावणे, पांडुरंग किन्नाके येनोरा यांचा समावेश आहे. यावेळी पं. स. सभापती अर्चना तिमांडे, उपसभापती वंदना फटींग, जि. प.सदस्य प्रेमीला करपाते, माजी प.स. सभापती संजय तपासे, पं.स. सदस्य कांताबाई वाघमारे, नामदेवराव तळवेकर, संजय फरताडे, ओंकार मानकर, बुरबुरे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)